मराठी पत्रकार परिषद शाखा अंबाजोगाईच्या वतीने दिल्या जाणारे 2024 चे पत्रकारिता पुरस्कार नितीन चव्हाण, दिनकर शिंदे, संतोष स्वामी यांना जाहीर

सब टायटल: 
दूरदर्शनचे प्रतिनिधी अरुण समुद्रे, आ नमिता ताई मुंदडा यांच्या सह मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये 4 फेब्रुवारी रोजी वितरण
Rajkiya

.

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
    मराठी पत्रकार परिषद शाखा अंबाजोगाईच्या वतीने दर्पण व मूक नायक दिनाचे औचित्य साधून देण्यात येणारा सन 2024 चा स्व. मुश्ताक हुसेन स्मृती पत्रकारिता पुरस्कार नितीन पापालाल चव्हाण- दै लोकाशा उपसंपादक बीड यांना, स्व. नंदकुमार पांचाळ स्मृती पत्रकारिता पुरस्कार दिनकर तुळशीराम शिंदे- दै. पार्श्वभूमी व डी एस न्यूज गेवराई यांना तर सहकार महर्षी स्व दत्तात्रय शिंदे स्मृती पत्रकारिता पुरस्कार संतोष बाबुराव स्वामी- दै लोकमत प्रतिनिधी दिंद्रुड यांना जाहीर झाला असुन या पुरस्काराचे वितरण 4 फेब्रुवारी रोजी दूरदर्शनचे प्रतिनिधी अरुण समुद्रे यांच्या हस्ते व आ नमिता ताई मुंदडा यांच्या सह अन्य मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये अंबाजोगाई शहरात होणार आहे.
     

       प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी मराठी 
पत्रकार परिषद मुंबई शाखा अंबाजोगाईच्या वतीने दर्पण दिन व मूकनायक दिनाचे औचित्य साधून 
बीड जिल्ह्यातील विविध तालुक्यात उल्लेखनीय लिखान, वृत्त निवेदन करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने मान्यवरांच्या हस्ते पत्रकारिता पुरस्काराचे वितरण करण्यात येते. याच कार्यक्रमाचे औचित्य साधुन देण्यात येणारा सन 2024 चा स्व. मौलाना मुश्ताक हुसेन स्मृती पत्रकारिता पुरस्कार नितीन पापालाल चव्हाण- दै लोकाशा उपसंपादक बीड यांना, स्व. नंदकुमार पांचाळ स्मृती पत्रकारिता पुरस्कार दिनकर तुळशीराम शिंदे- दै. पार्श्वभूमी प्रतिनिधी व डी एस न्यूज गेवराई यांना तर सहकार महर्षी स्व दत्तात्रय शिंदे स्मृती पत्रकारिता पुरस्कार संतोष बाबुराव स्वामी- दै लोकमत प्रतिनिधी दिंद्रुड यांना जाहीर करण्यात आलेला असुन या पुरस्काराचे वितरण दूरदर्शनचे प्रतिनिधी अरुण समुद्रे यांच्या हस्ते व आ नमिताताई मुंदडा यांच्या सह माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न होणार असुन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषदेचे बीड जिल्हाध्यक्ष विशाल साळुंके हे असणार आहेत. या प्रसंगी अंबा साखरचे चेअरमन रमेशराव आडसकर, बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख, माजी आ. पृथ्वीराज साठे, प्रसिद्ध उद्योजक प्रदीप ठोंबरे, न प चे मुख्याधिकारी डॉ उत्कर्ष गुट्टे, कार्यकारी अभियंता गौरीशंकर स्वामी, स्वा रा ती चे अधिष्ठाता डॉ भास्कर खैरे, पो नि विनोद घोळवे, पो नि पडवळ, जेष्ठ पत्रकार अमर हबीब, राम कुलकर्णी, ग्रामीण विकास मंडळाचे अध्यक्ष एस बी सय्यद, म प परिषद हल्ला विरोधी कृती समितीचे बीड जिल्हा निमंत्रक दत्तात्रय अंबेकर, डिजिटल मीडिया महाराष्ट्र राज्य प्रमुख अनिल वाघमारे, राज्य कार्यकारणी सदस्य विलास डोळसे, विभागीय संघटक सुभाष चौरे, आदी मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे.
   
      4 फेब्रुवारी 2024 रविवार रोजी सायंकाळी 5 वाजता येथील नगर परिषद वाचनालयात असलेल्या कै बाळशास्त्री जांभेकर पत्रकार कक्षात होणाऱ्या या कार्यक्रमास पत्रकार प्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे तालुका अध्यक्ष प्रशांत लाटकर, कार्याध्यक्ष पुनमचंद परदेशी, सचिव ज्ञानेश मातेकर यांच्या सह सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.