लातूर शहराचा पाणीपुरवठा थकबाकीमुळे खंडित तर इतर शहरांच्या नगरपरिषदेना दिल्या नोटीसा

सब टायटल: 
लातूर 26 कोटी तर अंबाजोगाई नगर परिषदेकडे पाच कोटी रु ची थकबाकी
Rajkiya

.

                       अंबाजोगाई (प्रतिनिधी)-

    बीड जिल्ह्यातील धनेगाव धरणातून लातूर ,कळंब, केज, धारूर ,अंबाजोगाई शहरासह ग्रामीण भागातील ग्रामपंचायत ना सुद्धा धनेगाव धरणातून पाणीपुरवठा केला जातो लातूरसह अनेक नगरपरिषद यांनी पाणीपट्टी न भरल्याने महानगरपालिका व नगरपरिषदा थकबाकीत आल्या आहेत थकबाकीच्या यादीत प्रथम क्रमांकावर लातूर महानगरपालिका येते या शहराचा पाटबंधारे सिंचन शाखा क्रमांक एकचे कार्यकारी अभियंता अमरसिंह पाटील यांनी पाणीपुरवठा काल बंद करण्याचा निर्णय घेतल्याने लातूर शहरावर निर्जळी येते की काय ? अशी शंका व्यक्त केली जात असून महानगरपालिकेचे आयुक्त यांनी तातडीने सदरील थकबाकी भरून पाणीपुरवठा सुरू करावा अशी नागरिकांतून मागणी होत आहे बघू या आयुक्त काय निर्णय घेतात ते

                धनेगाव धरण बीड जिल्ह्यात असले तरी धरणातील सर्वात जास्त पाण्याचा उपसा लातूर महानगरपालिका करते विशेष म्हणजे धनेगाव धरण बीड जिल्ह्यात व त्यावर नियंत्रण ठेवणारे कार्यालय लातूरकरांनी अंबाजोगाई होऊन लातूरला स्थलांतरित केले जिल्ह्यातील राजकीय नेत्यासह जनता लातूरकरांचे काहीच करू शकले नाही धरणातून पाणी उपसा करणारे लातूर शहर प्रथम क्रमांकावर येते आता थकबाकीतही लातूर महानगरपालिका प्रथम क्रमांकावर आल्याचे दिसते लातूर महानगरपालिकेकडे सिंचन खात्याची जवळपास 26 कोटी 45 लाख रुपये थकबाकी असल्याने पाणीपुरवठा काल बंद करण्याचा निर्णय सिंचन विभागाने लातूर पासून सुरू केल्याचे समजते त्या पाठोपाठ अंबाजोगाई नगर परिषदेचा क्रमांक लागतो अंबाजोगाई नगर परिषदेकडे पाच कोटी रुपयांची पाणीपट्टी थकबाकी आहे त्यानंतर कळंब नगर परिषदेकडे 16 लाख 94 हजार रुपये, केज,धारूर कडे 44 लाख 32 हजार यासह लातूर एमआयडीसी ग्रामपंचायत लोहटा, भालगाव ,युसुफ वडगाव, मालेगाव, धनेगाव आवाड शिरपुरा, शिराढोण , मुरुड, सारणी ,साळेगाव, करंजकल्ला ,दाभा, हिंगणगाव, चिंचोली माळी आदी ग्रामपंचायतकडे सुद्धा सिंचन विभागाची पाणीपट्टी थकबाकी आहे संबंधित संस्थांना थकबाकी भरा अन्यथा तुमचाहील पाणीपुरवठा बंद करण्यात येईल अशा नोटीसही सिंचन विभागाने दिल्या असल्याचे समजते आता सदरील ग्रामपंचायत व नगरपालिका या नोटीसची किती दखल घेतात व थकबाकी भरतात हे पाहावे लागेल त्यावरच त्यांचा पाणीपुरवठा सुरू राहील का बंद करण्यात येईल हे निश्चित होणार आहे