प्रशासकीय अधिकाऱ्यांनी राजकीय नेते बनू नये- जनतेची मागणी

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी)-
लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी व प्रशासन दोन चाके असतात दोन्हीही चाके एकाच गतीने चालली तर सर्वसामान्य जनतेला नक्की न्याय मिळतो प्रशासकीय अधिकाऱ्यांनी काय करावे काय करू नये याची बंधने शासनाने घालून दिलेली आहेत असे असताना प्रशासकीय अधिकारी स्वतःला राजकीय नेते समजून प्रशासकीय कामापेक्षा जनतेला मार्गदर्शन करू लागल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांनी राजकीय नेते बनू नये अशी जनतेतून मागणी होत आहे
अंबाजोगाई शहरात अनेक खाजगी रुग्णालय उद्घाटन शासकीय रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांच्या हस्ते झाले हे योग्य आहे की नाही ते प्रत्येकाने स्वतः ठरवायचे काही अधिकारी तर प्रशासकीय कामकाज करण्याऐवजी सतत राजकीय व्यासपीठावरून जनतेला मार्गदर्शन करताना दिसत आहेत हे कितपत योग्य आहे त्यांनी स्वतःच्या छातीवर हात ठेवून स्वतःलाच हा प्रश्न केला पाहिजे याच अंबाजोगाई शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शासकीय गाडीचा सुट्टीच्या दिवशी खाजगी कामासाठी वापर केला म्हणून अधिकाऱ्यांना जाब विचारून भंडावून सोडले होते त्यावेळी अधिकाऱ्याची भंबेरी उडाली होती त्यानंतर कोणत्याही अधिकाऱ्यांनी सुट्टीच्या दिवशी आपल्या खाजगी कामासाठी शासकीय गाडीचा वापर करण्याचे टाळले असल्याची बाब समोर आली मात्र अलीकडे प्रशासकीय अधिकाऱ्यांना भीती नावाची गोष्ट राहिली नाही की काय ? अशीही चर्चा होत आहे
प्रशासकीय अधिकाऱ्यांना खरोखरच समाजसेवा करायची आहे समाजसेवा करायची त्यांची इच्छा असेल तर प्रशासकीय सेवेतून सुद्धा समाजसेवा करता येते व्यासपीठावरून भाषण ठोकणाऱ्या अधिकाऱ्यांनी एकदा स्वतःच्या मनाला विचारले पाहिजे शासन आपल्याला ज्या कामासाठी पगार देते खरंच आपण त्या पदाला न्याय देऊ शकतो का ? जनतेचे किती प्रश्न आपण निस्वार्थपणे आज पर्यंत सोडवले अनेक कार्यालयामध्ये जनता चकरा मारून परेशान असते प्रशासनामार्फत आज या उद्या या आहे त्या कामाला कोलदंडा घातला जातो सर्वसामान्य जनतेला न्याय न देता राजकीय पुढार्यासारखे भाषणे ठोकणे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी बंद करावेत अशी ही मागणी जनतेतून होत आहे बघू या अधिकारी जनतेच्या मागणीची दखल घेतात की नाही