आठवणीतील रस्ता "मोरेवाडी- लकडीपूल -बी.एड.कॉलेज- बड़ा हनुमान मार्गे- सदरबाजार"

Shet Shivar

.

अंबाजोगाई शहरातील एक ना एक रस्ते चांगले होत असताना एका रस्ताच्या म्हणजेच " मोरेवाडी- लकडीपूल- बी.एड. कॉलेज- बड़ा हनुमान मार्गे- सदरबाजार" या रस्ताच्या नशिबात अतिशय वेदनादायी अनुभवाला सामोरे जावे लागत आहे.   अंबाजोगाईचे शासकीय बी.एड. कॉलेज एकेकाळचे अंबाजोगाइचे वैभव शासकीय कॉलेजची रुबाबदार भव्य इमारत व तेथेच पुढे चालून प्रेक्षाग्रहची भव्य इमारत बांधली गेली. क्रांतीगुरु वस्ताद लहुजी साळवे चौक मोरेवाडी ते  रमाई चौकाकडे जाणाऱ्या मार्गावरून एक रस्ता बड़ा हनुमान मार्गे -बी़.एड. कॉलेजच्या प्रेक्षाग्रहाच्या इमारती समोरून- सदर बाजारकडे जात असे.हा रस्ता प्रचंड वर्दळीचा होता पिढ्या न पिढ्या वापरातील. मोरेवाडीतील जुणी जाणती मंडळी त्याच्या आठवणी आजही सांगतात. पहिली पिठाची गिरणी गवळी पुऱ्यात एकमेव होती दळन आणण्यासाठी ,बेसिक शाळेत जाण्यासाठी या रस्ताचा वापर असे. पुढे चालून शासकीय बी.एड. कॉलेज वाल्यांनी  रस्ताला गेट बसवले - कमान केली चोहो बाजूने कंपाउंड बांधून तो रस्ता व छोटासा परिसर बंद केला. बरेच वर्ष लोक पायी चालण्याची संस्कृती होती तो पर्यंत गेटवरून उड्या मारून जात 

          बी.एड.कॉलेजवाल्यांना जुमानत नसत आणि ते रास्तही होते.पण हळूहळू लोकांचा ॲटो, मोटरसायकलचा वापर वाढला व पुढे रमाई चौक मार्गे लोक अंबाजोगाईला जावू लागले या रस्ताने जायला हळूहळू मज्जाव केला जावू लागला लोक हळूहळू विसरून जावू लागले. सगळे कसे बी.एड. कॉलेजच्या मनासारखे घडत होते खर तर या शासकीच बी.एड. कॉलेजला शेकडो एकर जमिनीचा प्रचंड परिसर लाभला होता पण हायरे दुर्दैव ....इकडे जसे एखादे फुलपाखरू आपल्या कोषात निपचित आनंदाने पडून राहते त्याला बाहेरच्या जगाशी काही देणे घेणे नसते त्याप्रमाणे या कॉलेजचे वर्तन होत गेले.काल परवा पर्यंत बाकीच्या शेकडो एकर जमीनीवर वहीती होत्या या पेरणी योग्य जमीन ज्यात पेरून भरपुर उत्पन्न काढले जात असे. ते काळांच्या ओघात व सतत पडत गेलेल्या अवर्षणामुळे  बंद पडले हळू हळू बंगले ओस पडले. लिंब, वढ ,आंबे, मोठमोठ्या बाभळी राजरोस तोडल्या गेल्या विचारणारे कुनीच नाही. आव-जाव घर तुम्हारा असेच काहिसे वातावरण होते.स्वतःच्या छोटया भागा भोवती कुंपन बांधून बसलेले. तेवढ्याच भागाला सिक्युरीटी गार्ड लावून फुरफुर शिट्टी मारत फिरनार चुकून कधी कोणी त्या भागात फिरकला की इकडे कुठे ? म्हणून तो विचारणार. खर तर शहर कोणतेही असो शासकीय जमिनीवर अतिक्रमण होत असताना वेळेवर लक्ष देणे फार महत्वाचे असते काहीच पाऊले उचलले गेले नाही तर पुढे खुप त्रासदायक होते. एवढ्या वर्षात कालाय तस्मै नमः या बी.एड. कॉलेजच्या बॅकफुटवर गेलेला  तो रस्ता अंबाजोगाईकरांच्या दृष्ट्रीने अतिशय महत्वाचा आहे कारण आज या रस्ताकडे दुर्लक्ष केले तर कायमचे त्यास मुकावे लागेल  हा रस्ता मोकळा करून रहदारीला वापरता यायला हवा असे वाटते.
आजची परिस्थीती सदर बाजाराकडून या रस्त्याला लागल्यास आजही रस्ता बड़ा हनुमान पर्यंत अतिशय दर्जेदार आहे पुढे मात्र त्यावर येड्या बाभळीचे झाडे उगवले आहेत पुढे बी.एड. कॉलेज कॅम्प परिसरात या रस्त्याला काटया कुपाट्या टाकून बंद केले आहे. हा रस्ता पुर्नजिवित झाल्यास शासकीय बी.एड. कॉलेजच्या वैभवात ही भर पडेल.

                     शब्दांकन -श्रीनिवास मोरे