लखलखत्या २१०० दिव्यांनी उजळला श्रीराम मंदिराचा परिसर....


.
अंबाजोगाई -(प्रतिनिधी )-
जय श्रीराम च्या जयघोषात रविवारी सायंकाळी येथील भट्टगल्ली परिसरातील श्रीराम मंदिरात आ. नमिता मुंदडा यांनी दीपोत्सवाचे आयोजन केले होते. यावेळी लखलखत्या २१०० दिव्यांनी श्रीराम मंदिराचा परिसर उजळून निघाला. यावेळी उपस्थित हजारो महिलांनी जय श्रीरामचा जयघोष केला.
आयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना निमित्त रविवारी आ. नमिता मुंदडा यांनी दीपोत्सवाचे आयोजन केले होते. यावेळी जय श्रीरामच्या ,व विविध कलाकृतीतून साकारलेल्या नक्षित महिलांनी पणत्या प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा केला. यावेळी
लखलखत्या २१०० दिव्यांनी श्रीराम मंदिराचा परिसर उजळून निघाला. यावेळी उपस्थित महिलांनी जय श्रीराम च्या जोरदार जयघोष करीत परिसर दणाणून सोडला. यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत श्रीराम मंदिराचे मठाधीपती गदाधरबुवा रामदासी यांनी केले. या कार्यक्रमास महिला व भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.