आकाशवाणी अंबाजोगाई केंद्राच्या कोणशिलेच्या उद्घाटन कार्यक्रमाला खा.डॉ प्रीतमताई मुंडे यांच्या अनुपस्थितीने अनेकांच्या भुवया उंचावल्या

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी )-
आकाशवाणी अंबाजोगाई एफएम सेंटरच्या कोनशीला उद्घाटनाचा कार्यक्रम आंबेजोगाई ते चनई रोडवर असणाऱ्या दूरदर्शनच्या इमारतीच्या परिसरात पार पडला या कार्यक्रमाला बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ प्रीतमताई मुंडे अनुपस्थित होत्या त्या कार्यक्रमाला का येऊ शकल्या नाहीत हे मात्र कळू शकले नाही मुंडे यांच्या अनुपस्थितीने अनेकांच्या भुवया मात्र उंचावल्याचे दिसत आहे
कोणत्याही पक्षाचा आमदार असो खासदार अलीकडे राजकारणात प्रत्येक बाब आपल्या प्रत्यनामुळे झाली असा दावा करण्याची जणू स्पर्धा लागली आहे अशा काळात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील इतरही केंद्राच्या सोबत अंबाजोगाई आकाशवाणी केंद्राचे कोनशिलेचे उद्घाटन दूरदर्शनच्या माध्यमातून पंतप्रधानांच्या हस्ते पार पडले अंबाजोगाई आकाशवाणी केंद्र बीड लोकसभा मतदारसंघात येते दोन दिवसापूर्वी अंबाजोगाई च्या एफएम सेंटरला मान्यता दिल्याचे प्रशासकीय पातळीवरून समजले स्थानिक पातळीवर फारसे अधिकारी वर्ग नसल्याने पुणे, बीड आकाशवाणी केंद्राच्या अधिकाऱ्यांना अंबाजोगाईला येऊन कार्यक्रमाची तयारी करावी लागली स्थानिक नागरिकांना पत्रकारांना त्यामुळे कार्यक्रमाचे निमंत्रण दिले गेले नसले तरी कितीही घाई असली तरी अधिकाऱ्यांनी जिल्ह्याच्या खासदार डॉ प्रीतमताई मुंडे यांना निमंत्रण तर दिले असणार कारण स्थानिक आमदार नमिता ताई मुंदडा यांनी या कार्यक्रमाला आपली हजेरी लावली केंद्रीय प्रसारण विभागाअंतर्गत होणाऱ्या कार्यक्रमाला जिल्ह्याच्या खासदार डॉ प्रीतम ताई मुंडे यांच्या गैरहजरीने चर्चेला उधाण आले आहे
अंबाजोगाई शहरातील पत्रकार तसेच विविध संघटनेच्या शिष्टमंडळाने खासदार डॉ प्रीतम ताई मुंडे एका कार्यक्रमानिमित्त अंबाजोगाई शहरात आल्या असता बंद पडलेल्या टीव्ही सब सेंटरच्या ठिकाणी एफएम सेंटर सुरू करावे यासाठी खासदारांना निवेदन द्यायचे होते त्यावेळी खासदाराच्या भोवती असणाऱ्या कळबोळ्यांनी अगोदर तर खासदारांना वेळ नाही असे निमित्त करून शिष्टमंडळाला परतवून लावण्याचा प्रयत्न केला होता कसेबसे शिष्टमंडळ खासदारापर्यंत पोहोचले तर खासदारांनी निवेदनाची एक ओळ ही वाचली नाही बघते बोलते करते एवढे आश्वासन देऊन शिष्टमंडळाची खासदारांनी बोळवन केली होती
त्यानंतर आज पावेतो कधीही खासदार डॉ प्रीतम ताई मुंडे यांनी अंबाजोगाईकरा सोबत या विषयावर साधी चर्चाही केली नाही थेट मंजुरीची घोषणा केंद्राकडून झाली यावेळी खासदार डॉ प्रीतम ताई मुंडे यांनी उपस्थित राहून अंबाजोगाई करांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली असेही आश्वस्त करता आले असते खासदारांनी तेही न करता पंतप्रधान मोदींच्या हस्ते दूरदर्शनच्या माध्यमातून अंबाजोगाई आकाशवाणी केंद्राच्या कोनशिलेच्या उद्घाटन कार्यक्रमाला अनुपस्थिती दर्शवल्याने शंका कुशंका व्यक्त केल्या जात आहेत सत्य परिस्थिती काय खासदार डॉ प्रीतम ताई मुंडे यांनी स्पष्ट केल्याशिवाय आम जनतेला कसे कळणार ? अशी ही चर्चा होत आहे