कंत्राटदाराने अंबाजोगाई शहरातील पथदिवे बंद करताच सीओ तथा प्रशासकांनी पर्यायी यंत्रणा उभी केली

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी)-
अंबाजोगाई नगर परिषदेचे दोन तत्कालीन सीओ नगर रचनाकार ,नगरसेविकेचा पती, कंत्राटदार यांच्यावर वृक्ष लागवड करणाऱ्या कंत्राटदाराकडून काम करून घेऊन बिल दिले नाही मात्र इतरांनी ते बिल घेऊन गेल्याने न्यायालयाने याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले हे प्रकरण ताजे असताना अंबाजोगाई शहरातील पथदिवे देखभाल व दुरुस्ती करणाऱ्या न्यू इरा इलेक्ट्रिकल्स या कंत्राट दराने विद्यमान सीईओ तथा प्रशासक डॉ उत्कर्ष गुट्टे यांच्यावर लेखी निवेदन देऊन गंभीर आरोपाचे लेखी पत्र जिल्हाधिकाऱ्याना दिल्याने नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यावर वादाची मालिका अखंडित सुरू झाली असल्याची चर्चा होत आहे
अंबाजोगाई शहरातील पथदिवे काल सुरू न झाल्याने शहरात सर्वत्र अंधार पसरला होता त्यामुळे नागरिकांतून नेमके झाले तरी काय ? असा सवाल केला जात होता दिनांक 18 जानेवारी रोजी नगरपरिषदेचे प्रशासक तथा सीओ यांना उद्देशून लिहिलेल्या निवेदनात इरा इलेक्ट्रिकलच्या वतीने म्हटले आहे की गेल्या दोन-तीन वर्षापासून अंबाजोगाई शहरातील पथदिवे देखभाल दुरुस्तीचे काम आपण करत आहोत मे 2023 पर्यंत देयके मिळाल्याने देखभाल दुरुस्तीचे काम व्यवस्थित करू शकलो मात्र त्यानंतर प्रत्येक महिन्याचे देयके कार्यालयात सादर केली आहेत आजपर्यंत जवळपास सहा ते सात महिने झाले देयके दिली नाहीत सहा-सात महिन्यात पंधरा-वीस वेळेला देयका संदर्भात प्रत्यक्षात भेटलो मात्र देतो बघतो अशी पोकळ आश्वासने देऊन सीओ यांनी देयक देण्यास टाळाटाळ केली असाही निवेदनात गंभीर आरोप करण्यात आला असल्याचे दिसते
गेल्या सहा-सात महिन्यापासून पेमेंट न मिळाल्यामुळे आपले आर्थिक नियोजन कोलमडले असून नियुक्त कामगारांना पगार न केल्यामुळे कामगार सुद्धा कामावर यायला टाळाटाळ करत आहेत कामगार येत नसल्याने शहरातील पथदिवे देखभाल व दुरुस्ती करू शकत नाही दिनांक 18 जानेवारीपासून काम बंद ठेवणार असल्याचेही लेखी तोंडी कळवल्याचे कंत्राटदाराचे म्हणणे आहे याबाबतीत सकारात्मक प्रतिसाद देण्याऐवजी नगरपरिषद प्रशासन काम बंद केल्यास कार्यवाही करण्यात येईल असा लेखी इशारा पत्र दिल्याचे कंत्राटदाराचे म्हणणे आहे
यावर कंत्राटदार म्हणतो नगरपरिषद प्रशासनाने कामाचे आदेश तसेच करारनामा केला त्यात दरमहा देयके देण्यात येईल असे म्हटले असताना सहा सात महिन्यापासून देयक न देता विना पैशाचे काम करावे म्हणणे म्हणजे वैयक्तिक अन्याय करत आहात असे वाटते असेही म्हटले आहे माझे काम अत्यावश्यक सेवेत येते हे तुम्हाला व मला माहित असल्याने सहा सात महिन्याचे देयके न देता सुद्धा काम करत आहे परंतु आपण माझ्या अत्यावश्यक सेवेचे देयके न देता इतर सर्व कंत्राटदाराचे दिले नियमित देत आहात माझे देयके न देता मला जाणून बुजून त्रास देण्याच्या व माझ्या कामात अडचण निर्माण करण्याचा आपला हेतू दिसून येतो असाही गंभीर आरोप केला आहे प्रलंबित देयके दिली नाहीत तर नाईलाजाने काम बंद करावे लागेल यामुळे शहरातील नागरिकांची गैरसोय होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आपणास माहीत असूनही फक्त मला त्रास देण्याच्या उद्देशाने आपण मला व नागरिकांना वेठीस धरत आहात हे निदर्शनास आणून देत असल्याचे कंत्राटदाराने शेवटी म्हटले आहे
प्रशासक गुट्टे यांनी करार रद्द केला
अंबाजोगाई शहरातील पथदिवे देखभाल दुरुस्ती करणाऱ्या कंत्राटदाराला काम थांबवता येणार नाही याची कल्पना देऊनही काम थांबवले या मुळे प्रशासनाने सदरील करार रद्द करून तात्पुरते मनुष्य बळावर पथदिवे सुरू केले असल्याचे सांगत कोणीही कंत्राटदार प्रशासन व जनतेला वेठीस नाही धरु शकत प्रशासनाला ठोस निर्णय घ्यावा लागतो तो घेतला
प्रशासक डॉ उत्कर्ष गुट्टे म्हणाले सदरील कंत्राटदाराने गेली अनेक दिवसापासून विद्युत दाहिनीचे काम घेतले ते पूर्ण केले नाही बगीचा मध्ये अर्धवट विद्युतीकरण केल्यामुळे काम थांबले आहे मार्च अखेर काम पूर्ण केले नाही तर त्याही कामा बद्दल योग्य तो निर्णय घ्यायला मागे पुढे पाहणार नसल्याचे स्पष्ट केले आहे