दोन तत्कालीन सीओसह नगररचनाकार, नगरसेविकेचा पती ,कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

.
अंबाजोगाई(प्रतिनिधी )-
अंबाजोगाई नगरपरिषद प्रशासनाने सन 2018 मध्ये शहरातील विविध भागात हरित पट्टा अंतर्गत वृक्ष लागवड करायची होती हे काम करणाऱ्या केंद्रे गार्डन नर्सरीने काम केले असताना परस्पर या कामाच्या बिलाच्या निधीची विल्हेवाट लावली केंद्रे गार्डन नर्सरीच्या प्रोप्रायटर कानोपात्रा विष्णू केंद्रे यांनी आंबेजोगाईचे न्यायालयात पुराव्यासह तक्रार दाखल केल्यानंतर न्यायालयाने अंबाजोगाई नगर परिषदेचे तत्कालीन सीओ डॉ सुधाकर जगताप ,अशोक साबळे, तत्कालीन नगर रचनाकार अजय कस्तुरे,तत्कालीन नगरसेविकेचे पती सुनील व्यवहारे, सिद्धी कन्स्ट्रक्शन कंपनीचे राणा चव्हाण तत्कालीन लिपिक दीक्षित (मयत)आदी सहा जणांच्या विरुद्ध कलम 420 सह 34 भादवी अन्वये गुन्हा दाखल करून तपास करावा असे आदेश दुसरे प्रथम न्याय दंडाधिकारी यांनी दिले आहेत
केंद्रे गार्डन नर्सरीच्या प्रोप्रायटर कान्होपात्रा विष्णू केंद्रे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की उमराई ता. अंबाजोगाई येथे केंद्रे गार्डन नर्सरी आहे त्याचा परवाना ई -427 असा आहे अंबाजोगाई नगर परिषदेने शहरातील विविध भागात हरित पट्टा अंतर्गत वृक्ष लागवड करून वर्षभर जोपासना करण्यासाठी राणा चव्हाण यांच्या सिद्धी कन्स्ट्रक्शन या एजन्सीला ई-निविदा क्रमांक 4 दि. 4/7/ 2018 रोजी मंजूर करून कॉन्टॅक्ट दिले होते सदरील निविदे अंतर्गत प्रत्यक्षात काम करण्याकरिता कान्होपात्रा केंद्रे यांच्या केंद्रे गार्डन नर्सरी, उमराई या सिद्धी कन्स्ट्रक्शन कंपनीने झाडे पुरवणे व लावण्यासाठी सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून दि. 16/ 7/ 2018 रोजी अधिकार पत्र देऊन नेमले होते वृक्ष लागवडीचे काम पूर्ण करून कामाचे बिल उचलून घ्यावेत असे अधिकार पत्रात हक्कात दिलेले आहे यानुसार केंद्रीय गार्डन नर्सरीने विहित कालावधीत सदरील कामही पूर्ण केली लेखा विभागाकडे केलेल्या कामाचे बिल द्यावे अशी विनंती केली असता उपनगराध्यक्षाच्या परवानगीशिवाय बिल देऊ शकत नाही असे लेखा विभागाकडून उत्तर देण्यात आले
केंद्रे यांनी माहिती अधिकार अंतर्गत माहिती घेतली असता जन माहिती अधिकारी असणारे तत्कालीन रचनाकार यांनी दिलेल्या माहितीनुसार तत्कालीन लेखा विभागात काम करणारे दीक्षित व सुनील व्यवहारे यांनी संगणमत करून सिद्धी कन्स्ट्रक्शनचे नावे असलेले तीन धनादेश रक्कम आठ लाख 96 हजार 775 /-रुपये स्वतःची सही करून उचलून घेऊन गेले पैसे उचलून अपहार केला वरील सर्व आरोपींनी केंद्रे गार्डन नर्सरीने झाडे पुरवणे व लावण्याचे काम करावयास लावले व केलीही एकूण निविदा 66 लाख रुपयांची आहे सन 2018 पासून सर्व कामे करायला लावली एकही रुपया बिल मिळाले नाही सर्वांनी संगणमत करून किती बिल उचलले आम्हाला कळू दिले नाही असेही तक्रारीत म्हटले आहे 2018 पासून केलेल्या संघर्षाला पाच वर्षानंतर न्यायालयाकडून न्याय मिळाला असून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश अंबाजोगाई शहर पोलिसांना आज न्यायालयाने दिले असल्याचेही कानोपात्रा विष्णू केंद्रे यांनी सांगितले