एवढा करोडो रुपयांचा प्रचंड निधी आणला कधी कधी आपल्यालाही स्वतःवर विश्वास बसत नाही - आमदार नमिताताई मुंदडा

Rajkiya

.

                   अंबाजोगाई (प्रतिनिधी)-

         केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार म्हणून निवडून आल्यानंतर सुरुवातीचा काळ विरोधी पक्षात असल्याने व आपण नवीन आमदार होतो काही काळ फारसे करता आले नाही नंतरचा काळ कोरोनाचा गेला मात्र त्यानंतर राज्यात आपली सत्ता आली केज विधानसभा मतदारसंघासाठी सत्ता आल्यानंतर जो निधी आला आपल्यालाही कधी कधी विश्वास बसत नाही की आपण एवढा करोडो रुपयांचा प्रचंड निधी आणू शकलो अभिमानाने सांगते राज्यातील ज्या आमदारांनी आपल्या मतदारसंघासाठी निधी खेचून आणला त्या पहिल्या पाच पैकी दुसरी किंवा तिसरी मी आमदार आहे याचा आपल्याला अभिमान वाटतो असेही आमदार नमिताताई मुंदडा यांनी अभिमानाने सांगितले त्या शहरातील दुर्गा नगर येथील कार्यक्रमात बोलत होत्या

           भाजपाच्या वतीने एक बार फिर मोदी सरकार हे स्लोगन भाजप समर्थक नागरिकांच्या प्रत्येकाच्या घराच्या दर्शनी भागावर लिहिण्याचा अभियानाचा शुभारंभ अंबाजोगाई शहरातील दुर्गा नगर वसाहतीतून काल प्रथमच आमदारांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बोलताना आमदार नमिताताई मुंदडानी राज्य सरकारने केलेल्या रस्त्याच्या कामाचा उल्लेख करत अंबाजोगाई शहर तसेच केज मतदार संघात निधी कसा आणायचा यासंदर्भात ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा (काकाजी ) अक्षय मुंदडा यांच्या अनुभवाचा फायदा तर होतच आहे त्याबरोबर सत्ता असेल तर किती बदल होऊ शकतो हे आपल्या लक्षात आले असेल आमदारकीचे हे आपले पाचवे व शेवटचे वर्ष असले आपण किती निधी आणला याचा विश्वास स्वतःलाही बसत नसला तरी आणखीन बराच विकास करणे बाकी आहे तो आपण भविष्याच्या काळात करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही आमदार म्हणाल्या

           अंबाजोगाई शहराचा आपण खूप विकास केला असे वक्त्यांनी बोलताना सांगितले मात्र असे काही म्हणू नका आणखीन अंबाजोगाई शहरातील भरपूर कामे करायची आहेत दोन टक्के सुद्धा ही शहराचा विकास झाला नाही असे आपले मत असून यापुढेही अशीच कामे आपण करत राहू अंबाजोगाई शहरासाठी पूर्वी निधी आला नाही असे नाही दर्जेदार कामे झाली तर काही वर्ष ते टिकतात मात्र तेच ते गुत्तेदार दर्जेदार कामे झाले नाही तर पुन्हा दोन वर्षात रस्ता खराब होतो अंबाजोगाई शहरातील ज्येष्ठ महिला लहान मुला मुलींना विरंगुळा म्हणून गार्डनचा विकास करण्यासाठी आपण सुरुवात केली आहे आता थातूरमातूर रस्ते शहरात होणार नाहीत किमान दहा वर्ष तरी आमचा रस्ता करा अशी मागणी घेऊन कोणीही नागरिक येणार नाहीत अशी दर्जेदार रस्ते होत आहेत आपण तो प्रयत्न करत असल्याचेही आमदार मुंदडा म्हणाल्या

            अंबाजोगाई शहरात गार्डन साठी वीस कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे तो निधी असाच आपण खर्च करू देणार नाही लातूर ,जालना , छत्रपती संभाजीनगर व इतर मोठ्या शहरांमध्ये अत्याधुनिक सुविधा असलेले पार्क बनवलेत त्या धरतीवर अंबाजोगाई शहरातील अत्याधुनिक पार्क बनवण्यात येईल यशवंतराव चव्हाण चौकातील क्रीडा संकुलाचा खरपूस समाचार घेत आमदार म्हणाल्या किती बोगस काम झाले आहे इमारत ताब्यात घेण्याअगोदर त्या इमारतीला गळती लागली असे बोगस काम करणाऱ्या गुत्तेदारावर कार्यवाही करायला लावून केलेले बोगस काम पाडून नवीन निधी आणून भव्य दिव्य असे क्रीडा संकुल सर्व सोयी युक्त बनवण्याचा आपला संकल्प असल्याचेही आमदार मुंदडा यांनी बोलताना सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालमार्तंड प्रकाश बोरगावकर यांनी केले या कार्यक्रमाला डॉ जोशी मॅडम ,माजी नगराध्यक्ष महादू मस्के, महेंद्र निकाळजे , राणा चव्हाण, कृष्णा लोमटे सह दुर्गा नगर भागातील महिला नागरिक उपस्थित होते