महिलेवर शस्त्रक्रिया करूनही गर्भ पोटातच राहिला रुग्णाच्या हा तर जीविताशी खेळ

सब टायटल: 
विभाग प्रमुखाच्या दुर्लक्षाचा परिणाम ; प्रशासनामार्फत प्रकरणाची चौकशी होईल का ?
Arogya Shikshan

.

               अंबाजोगाई (प्रतिनिधी)-

      स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयातील प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे एक दीड महिन्यापासून सिटीस्कॅन मशीन बंद आहे त्याचा भुर्दंड गरीब रुग्णांना सोसावा लागत आहे दुसरीकडे रुग्णालयातील स्त्रीरोग  विभागाच्या प्रसूती कक्षातील गंभीर प्रकार समोर आला आहे एक महिला गर्भ काढण्यासाठी रुग्णालयात आली डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया केली मात्र गर्भ बाहेर न काढता निष्काळजीपणामुळे तसाच पोटात राहिला नंतर त्रास होत असल्याने ती महिला पुन्हा रुग्णालयात दाखल झाली पुन्हा त्या महिलेवर शस्त्रक्रिया करून मृत गर्भ काढण्यात आला हा रुग्णाच्या जीवनाशी खेळ नव्हे का ? असा सवाल करत विभाग प्रमुखाच्या दुर्लक्षामुळेच असे अनेक गंभीर प्रकार या विभागात घडत असल्याची दबक्या आवाजात चर्चा होत असून प्रशासनामार्फत या प्रकरणाची चौकशी होईल का ? असाही जनतेतून सवाल केला जात आहे

            अतिशय गंभीर घटनेची समजलेली माहिती अशी की अंबाजोगाई तालुक्यातील ग्रामीण भागात राहणारी महिला रुग्णालयात दाखल झाली त्याला तिसऱ्यांदा झालेली गर्भधारणा नको होती यासोबत त्याला कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करावयाची होती म्हणून ती दिनांक 2 डिसेंबर 2023 रोजी एस आर टी आर रुग्णालयात भरती झाली डॉक्टरांनी शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असणाऱ्या चाचण्या करून घेतल्या चार डिसेंबर 2023 रोजी मिनी सिझेरियन करून गर्भपात केला त्यानंतर या महिलेची कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया ही करण्यात आली ही सर्व प्रक्रिया  कागदोपत्री झाली मात्र गर्भ महिलेच्या पोटातच राहिल्याने दिनांक दहा डिसेंबर २०२३ रोजी रात्री रक्तस्राव जास्त होऊ लागल्याने दुसऱ्या दिवशी 11 डिसेंबर रोजी पुन्हा ती महिला एस आर टी आर  रुग्णालयात दाखल झाली पुन्हा त्या महिलेची शस्त्रक्रिया करून पोटातील एक किलो वजनाचा गर्भ अर्भक बाहेर काढला सदरील शस्त्रक्रिया शासकीय रुग्णालयातील तीन तज्ञासह एका सहाय्यकाने शस्त्रक्रिया केल्याची नोंद महिलेच्या रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतर दिलेल्या कार्डावर नोंद असल्याचे दिसते अतिरक्तस्राव झाल्याने महिलेला अतिदक्षता विभागातील उपचार करावे लागले होते

विभाग प्रमुख, डीन यांचे काय म्हणणे आहे

         अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयातील एका महिलेवर गुदरलेला प्रसंग समोर आल्यानंतर प्रस्तुती विभागाचे विभाग प्रमुख डॉ गणेश तोडगे म्हणतात गर्भपाताची प्रक्रिया करताना सोनोग्राफी पाहणे आवश्यक होते गर्भपात नंतर पूर्ण पिशवी तपासायला हवी होती याबाबतीत संबंधिताकडे विचारणा केली असता जुळा गर्भ असल्यामुळे एक गर्भ पोटातच राहिला असू शकतो असे सांगितले सदरील घटनेची माहिती वरिष्ठांना कळवली जाईल असे डॉ तोडगे सांगतात रुग्णालयाचे अधिष्ठता डॉ भास्कर खैरे यांनी या प्रकरणाची माहिती तुर्त आपल्याकडे नाही संबंधित विभागाचे विभाग प्रमुख डॉ गणेश तोडगे यांच्याकडून तपशीलवार माहिती घेतल्यानंतर त्यानंतर सर्व बाबींचा खुलासा होईल असे सांगितले एकूणच स्त्रीरोग विभाग असो मेडिसिन , एक्स-रे ,सिटीस्कॅन अशा विविध समस्या तसेच कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांवर प्रशासनाची म्हणावी तशी पकड राहिलेली नसून पकड सैल झाल्यामुळे जाब कोणीच कोणाला विचारत नसल्याने हे प्रकार वाढण्याची चर्चा रुग्णात होत आहे

बदल्या रद्द झाल्याने विभाग प्रमुख निवांत 

         अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयामध्ये कोणीही यायला तयार नाही आम्हीच मोठा त्याग करून या ठिकाणी कार्यरत आहोत असा अविर्भाव विविध विभाग प्रमुख प्रशासनाला दाखवत असल्याने प्रशासन या विभाग प्रमुखांना त्यांची कर्तव्य काय आहेत हे दाखवू शकले नसल्याचे समजते मध्यंतरी या सर्व विभाग प्रमुखांच्या बदल्या झाल्यानंतर सर्वांची तोंडे बारीक झाली होती आपल्या लाडक्या नेत्याकडे विभाग प्रमुखांनी अर्ज केल्याने पुढार्‍यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावल्याचे समजते राजकीय ,न्यायालयीन प्रक्रियेच्या माध्यमातून झालेल्या बदल्या रद्द झाल्याने पुन्हा पाहिले पाढे 55 अंबाजोगाईला कोणीही डॉक्टर यायला तयार नाही ही बाब साफ खोटी असल्याचे मुंबईहून आलेल्या डॉ अनुपमा पाटील यांनी सिद्ध करून दाखवले असल्याचे समजते त्या रेडिओलॉजी विभागाच्या विभाग प्रमुख म्हणून रुजू झाल्या आहेत संचालक कार्यालयाने त्यांना अजून आदेश दिले नाहीत आज येतील उद्या येतील या आशेवर गेली तीन-चार महिन्यापासून त्या कुठल्याही पगार नसताना अंबाजोगाईच्या रुग्णालयात थांबल्या असल्याचे समजते विशेष म्हणजे स्वतःच्या शासकीय निवासाची दुरुस्ती त्यांनी स्वतःच्या पैशातून त्यांना करावी लागली ही गंभीर बाब लपून राहिलेले नाही अशा मुंबईहून आलेल्या डॉक्टरांसाठी एकही राजकीय नेता पुढे का येत नाही ? अंबाजोगाईला कोणी यायला तयार नाही आम्हीच त्याग करून राहतो या दाव्याला या घटनेने खोटं ठरवले असल्याचे समजते अनेक वर्षापासून रेडिओलॉजी विभागाला विभाग प्रमुख नव्हता आला तर त्याच्या पाठीशी कोणीही उभे राहायला तयार नाही पुन्हा सोडून गेले की म्हणायला मोकळे बघा! आम्हीच अंबाजोगाईला राहू शकतो बाहेरचे डॉक्टर अंबाजोगाईला येत नाहीत का येत नाहीत तर त्यांना कोणी स्थानिक पातळीवर साथ देत नाही ही सत्यता सर्वांनाच मान्य करावी लागेल एवढे मात्र नक्की !