अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीन बंद का आहे ?


.
अंबाजोगाई (प्रतिनिधी)-
स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीन गेली एक महिन्यापासून जास्त कालावधी पासून बंद आहे रुग्णांना खाजगीत जाऊन सिटीस्कॅन करावा लागत आहे अनेक वेळा गोरगरीब रुग्ण खाजगीत आर्थिक अडचणीमुळे सिटीस्कॅन करू शकत नसल्याने पुढील उपचारही सध्या थांबलेले आहेत रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीन कालबाह्य झाल्याने बंद असल्याचे समजते रुग्णालयाचे डीन डॉ भास्कर खैरे यांची सेवानिवृत्ती जवळ आल्याने ते धोरणात्मक कुठलाच निर्णय घ्यायला तयार नसल्याची ही माहिती समोर येत आहे त्यांनी नवीन सिटीस्कॅन मशीनची खरेदीचा प्रस्ताव देण्याऐवजी कालबाह्य मशीन वरच नाहक वर्षभर खर्च केला आताही तीच सिटीस्कॅन मशीन सुरू करण्यावर ते ठाम असल्याचे समजते
डीन डॉ खैरे पुढील महिन्यात आपली सेवापूर्ती होऊन सेवानिवृत्त होणार आहेत निवृत्तीनंतर नसलेली झंझट नको म्हणून त्यांनी गेली वर्षभराच्या काळात रुग्णाच्या हिताच्या दृष्टीने कोणताही धोरणात्मक निर्णय घेतला नसल्याचे समोर आले आहे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णाची सोय व्हावी म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी यापूर्वीच एम आर आय मशीन दिली आहे केजच्या आमदार नमिताताई मुंदडा यांनी रुग्णालयातील विविध शस्त्रक्रिया गृहाची श्रेणीत वाढ करण्यासाठी करोडो रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे असे असताना निवृत्ती जवळ आली म्हणून अधिष्ठाता कातडी बचाव धोरण अवलंब करत असल्याने एक ते दीड महिन्यापासून रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीन बंद आहे या संदर्भात आज तरी तातडीने नवीन मशीनचा प्रस्ताव सादर करण्याऐवजी तीच सिटीस्कॅन मशीन सुरू करा अशी भूमिका अधिष्ठाता कार्यालयाची असल्याचे समजते
अंबाजोगाईच्या रुग्णालयात जी सिटीस्कॅन मशीन आहे ती मशीन फिलिप्स कंपनीकडून सन 2012 मध्ये खरेदी केली गेली होती त्या मशीनचा कालावधी दहा वर्षाचा होता यानुसार 2012 मध्येच या मशीनची मुदत संपलेली होती त्यानंतर नवीन मशीनचा प्रस्ताव अधिष्ठता कार्यालयाकडून जाणे अपेक्षित होते मात्र नवीन सिटीस्कॅन मशीनचा प्रस्ताव न देता त्याच मशीनची दुरुस्ती करण्यात आली करार संपल्यानंतर त्या कंपनीचा मेकॅनिकची नुसत्या भेटीची फीस एक लाख रुपयांच्या दरम्यान असते इतर दुरुस्ती अथवा पार्ट ची किंमत वेगळी अधिष्ठाता कार्यालयाने गेली वर्षभरात सिटीस्कॅन मशीन दुरुस्तीवर किती खर्च केला याचा तपशील मात्र अद्यापही मिळू शकलेला नाही डिसेंबर महिन्यात सिटीस्कॅन मशीन बंद पडली जानेवारीचा महिना अर्धा गेला तरी अधिष्ठता कार्यालय व कंपनीचा मेकॅनिक अजूनही दोघांमध्ये चर्चा सुरू असल्याचे समजते समजलेल्या माहितीनुसार कंपनीने अधिष्ठाता कार्यालयाला स्पष्ट शब्दात सुनावले की सदरील सिटीस्कॅन मशीन कालबाह्य झाली तुम्ही नवीन मशीन खरेदी करा अधिष्ठता कार्यालय म्हणते हीच मशीन सध्या सुरू करायची तुम्ही तुमचे कोटेशन द्या त्यानुसार त्या मेकॅनिकच्या मते त्याची व्हिजिट फीस एक लाख रुपये असेल त्यानंतर वर्षभराचा वार्षिक कराराचे 80 लाख व आज जे पार्ट निकामी झालेत त्याचा खर्च एक ते सव्वा कोटी रुपयांपर्यंत जातो सिटीस्कॅन मशीनची किंमत दीड कोटी रुपये असल्याचे समजते नवीन मशीन घेतली तर दहा वर्षे कंपनी मेंटेनेस करते एक वर्षासाठी सव्वा कोटी रुपये खर्च करणे योग्य की नवीन मशीन घेणे योग्य ठरवणार कोण ? अधिष्ठाता ते तर निर्णय घ्यायला तयार नाहीत काय होणार या रुग्णालयाचे असा प्रश्न रुग्णातून केला जात आहे
पालकमंत्री, आमदारांनी यात लक्ष द्यावे !
अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात बीड जिल्ह्यातीलच नव्हे तर मराठवाड्यातून रुग्ण उपचारासाठी येतात शासकीय रुग्णालयात उपचार घेणारे रुग्ण गोरगरीब असतात निवृत्ती मुळे रुग्णालयाचे डीन धोरणात्मक आर्थिक निर्णय घेणार नसतील तर राजकीय अभिनव बाजूला ठेवून जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, केज विधानसभेच्या आमदार नमिताताई मुंदडा यांनी रुग्णालयात निर्माण झालेल्या परिस्थितीत लक्ष घालून आरोग्य संचालकांना हस्तक्षेप करून सिटीस्कॅनचा प्रश्न सोडवायला लावावा अशी जनतेतून मागणी होत आहे आमदार नमिताताई मुंदडा तर स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी तातडीने या प्रकरणी हस्तक्षेप करून हजारो गोरगरीब रुग्णाचे उपचार तातडीने व्हावेत यासाठी सिटीस्कॅन मशीन प्रश्न प्रशासकीय पातळीवर सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी रुग्णातून मागणी होत आहे पाहूया लोकप्रतिनिधी काय भूमिका घेतात ते याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे