अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील ससेवाडी येथे कंटेनर आणि पिक अप अपघातात ५ जण जागीच ठार



.
आज दि.१२ जानेवारी शुक्रवार रोजी रात्री अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील मांजरसुंभा ते पाटोदा दरम्यान ससेवाडी फाट्यावर कंटेनर आणि पिक अपच्या समोरासमोर झालेल्या भिषण अपघातात ५ जण जागीच ठार झाले आहेत. अपघात एवढा भिषण होता की मृतदेह बाहेर काढण्यासाठी बराच वेळ लागला.घटनास्थळी नेकनुर पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गट्टुवार दाखल झाले असुन दोन मृतदेह नेकनुर ग्रामीण रुग्णालयात पाठवले असुन ईतर मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
अपघातात ५ ठार
---
बीड तालुक्यातील महाजनवाडी येथील रहिवासी प्रल्हाद सिताराम घरत वय ६३ वर्षें आणि त्यांचा मुलगा नितीन प्रल्हाद घरत वय ४१ वर्षे तर पाटोदा तालुक्यातील वाघिरा येथील विनोद लक्ष्मण सानप वय ४० वर्षे हे अपघातात जागीच ठार झाले आहेत.... कंटेनर मधील दोघे ठार झाले असल्याची माहिती मिळाली आहे..