वसुंधरा सेवा प्रतिष्ठान खेळाडुंना व्यासपीठ देणार- अक्षय मुंदडा

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी) -
राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा आणि वसुंधरा सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्र चेतना दौड स्पर्धेत महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून आलेल्या खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या स्पर्धेचे यंदाचे हे दुसरे वर्ष होते. दरवर्षी घेण्यात येणाऱ्या या स्पर्धेमुळे अंबाजोगाई तालुक्यातील खेळाडूंना नवउर्जा मिळत आहे. आगामी काळात मतदारसंघातील खेळाडूंना संधी मिळवुन देण्यासाठी वसुंधरा सेवा प्रतिष्ठान व्यासपीठ निर्माण करूनच देणार असल्याची ग्वाही अक्षय मुंदडा यांनी दिली. विजेत्याचे अभिनंदन करताना स्पर्धेत जय-पराजयापेक्षा घेतलेला सहभाग उल्लेखनीय असतो या शब्दांत त्यांनी खेळाडूंचे कौतुक केले.
राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त वसुंधरा सेवा प्रतिष्ठानच्या वतीने अंबाजोगाई शहरात राष्ट्र चेतना दौड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेसाठी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते संत भगवानबाबा चौक व परत छत्रपती शिवाजी महाराज चौक हा पाच किमी अंतराचा मार्ग निवडण्यात आला होता. या राष्ट्र चेतना दौड स्पर्धेत महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातील जवळपास दोन हजार खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धकांमध्ये मुली, महिलांची संख्या लक्षणीय होती हे विशेष. १८ ते ३०, ३१ ते ४५ आणि ४६ ते ६० अशा वयोगटात पुरुष आणि महिलांच्या स्वतंत्र स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धकांसाठी जागोजागी पिण्याच्या पाणी, एनर्जी ड्रिंक आदीची सोय करण्यात आली होती. तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णवाहिका देखील तयार ठेवण्यात आल्या होत्या. स्पर्धेच्या पूर्ण मार्गावर पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. स्पर्धकांच्या अतिशय जोशपूर्ण प्रतिसादात या सार्ध पार पाडळ. अतिशय या स्पर्धेचे यशस्वी नियोजन वसुंधरा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय मुंदडा, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा आणि त्यांच्या संपूर्ण टीमने केले होते.
या स्पर्धेचे बक्षीस वितरण भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते राम कुलकर्णी, माजी उपनगराध्यक्ष सारंग पुजारी, पत्रकार अभिजीत गाठाळ, पोलीस निरिक्षक विनोद घोळवे, सहा. निरिक्षक चांद मेंडके, उप निरिक्षक जाधवर, तालुका कृषी अधिकारी वडखेलकर, डॉ. सिद्धेश्वर बिराजदार, डॉ. गोरे, डॉ. झरकर, समृद्धी भुरमे, डॉ. साखरे, रमण सोनवळकर, सोळंके सर आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश बोरगावकर यांनी केले.
‘मॅनेजमेंट गुरू’ नंदकिशोर मुंदडा
स्पर्धा व्यवस्थापन करताना पहाटे चार वाजल्यापासुन भाजप नेते नंदकिशोर मुंदडा रस्त्यावर उतरले होते. स्वतः मॅनेजमेंट गुरू असल्याने ज्या रस्त्यावर स्पर्धक धावणार त्या ठिकाणी पहाटे पहाणी करून व्यवस्थित जबाबदारी कार्यकर्त्यांना कामाला लावले. एवढेच नाही तर छत्रपती शिवाजी चौक ते संत भगवानबाबा खेळाडू जेव्हा धावत होते त्यावेळी स्वतः दुचाकीवर कुठलाही प्रकार घडता कामा नये यासाठी मुंदडांनी खेळाडूसारखाच प्रत्येक टिमसोबत धावता प्रवास केला. वयाचा विचार न करता त्यांच्यातला कार्यकर्ता नेहमीच रस्त्यावरच्या कामाला प्राधान्य देत क्रियामान क्रियाशील कसा असतो हे त्यांच्या अंगभूत स्वभावात नेहमीच दिसून येते.
स्पर्धेतील विजेते -
१८-३० वयोगट (पुरुष)
प्रथम - रामेश्वर विजय मुंजाळ (छत्रपती संभाजीनगर), द्वितीय - प्रदीप उदयसिंग राजपूत (छत्रपती संभाजीनगर), तृतीय - गणेश रामनाथ होंडे (काळेगाव हवेली), उत्तेजनार्थ - ओंकार अनंत चांदीवाड (मुंबई)
१८-३० वयोगट (महिला)
प्रथम - साक्षी संजय जड्याळ (सातारा), द्वितीय - अश्विनी मदन जाधव (परभणी), तृतीय - प्रमिला पांडुरंग पाटील (चिपळूण), उत्तेजनार्थ - साक्षी सुभाष पवार (चिपळूण)
३० ते ३५ वयोगट (पुरुष)
प्रथम - साईनाथ काशिनाथ फुके, द्वितीय - आबासाहेब पांडुरंग राऊत, तृतीय - तुकाराम विठ्ठल मरकड, उत्तेजनार्थ - अजय विठ्ठल नागरगोजे
३० ते ३५ वयोगट (महिला)
प्रथम - ज्योती शंकरराव गवते, द्वितीय - जयक्रांती संभाजी करपे, तृतीय - अश्विनी दीपक कोरडे, उत्तेजनार्थ - मीरा तुकाराम पवार
४५ च्या पुढील वयोगट (पुरुष)
प्रथम - अकलोड साईनाथ किस्टोबा, द्वितीय - भीमराव मारोती शिंगाडे, तृतीय - केशव माणिकराव मोटे, उत्तेजनार्थ - थोरात नितीन राजेंद्र
४५ च्या पुढील वयोगट (महिला)
प्रथम - त्रिशला रावसाहेब शेळके, द्वितीय - अपर्णा सूर्यकांत वडखेलकर, तृतीय - मंदोधरी बबन मुंडे, उत्तेजनार्थ - उषा यादव