नव्वद वर्षीय वृद्ध महिलेचा झोपडीच्या आगीत होरपळून मृत्यू

सब टायटल: 
घटनेचा केला पोलिसांनी पंचनामा
Crime

.

                    गेवराई (प्रतिनिधी )- 

गेवराई तालुक्यातील खेर्डावाडी येथे घराला आग लागून वयोवृद्ध महिला जळून खाक झाल्याची घटना गुरुवार(ता.11)जानेवारी रोजी दुपारी एकच्या सुमारास घडली.

           खेर्डावाडी येथे वालाबाई शहाजी  भिसे(वय 90)वर्ष या कुडाच्या घरात राहात होत्या.शेजारच्या घरातील महिलांनी चूल पेटवून स्वयंपाक पाणी केल्यानंतर चुलीतील विस्तव वाऱ्याने उडून वालाबाई यांच्या कुडाच्या घरात गेला व कुडाला आग लागली.या आगीमध्ये वालाबाई यांना चालता येत नसल्यामुळे होरपळून त्यांचा जागीच मृत्यू झाला.घटनेचा तलवाडा पोलीसानी पंचनामा केला आहे