खासदार ताई अंबाजोगाईकरानी मागितले होते तरी काय ?

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी ) -
देशात व राज्यात भाजपचे सरकार आहे बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ प्रीतम ताई मुंडे दोन वेळा खासदार म्हणून बीड जिल्ह्यातून निवडून आल्या आहेत दोन टर्म मध्ये खासदारांना अंबाजोगाईकरानी काय मागितले असे कोणालाही आठवत नाही मागायला सर्वसामान्य जनतेची व खासदाराची भेट तरी व्हावी लागेल ना ? हो आले लक्षात मागील एक ते दीड वर्षात अंबाजोगाई शहरातील विविध राजकीय पक्षाच्या संघटना तसेच पत्रकारांनी खासदाराकडे एक लेखी मागणीचे निवेदन देऊन मागणी केली होती ती म्हणजे अंबाजोगाई शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या केंद्रीय माहिती प्रसारण व नभोवाणी खात्याचे टीव्ही सेंटर उभारून सेंटर सुरू केले होते नंतर काय झाले माहित नाही गेले काही वर्षांपूर्वी सदरचे सेंटर हे बंद झाले आहे सेंटरमध्ये असणाऱ्या साहित्याचा लिलाव झाला असून साहित्यही या ठिकाणाहून गेले असल्याचे समजते आता त्या ठिकाणी इमारती तसेच भव्य टॉवर उभा आहे तसेच दूरदर्शनच्या कर्मचाऱ्यासाठी मेडिकल परिसरात चनई रोडवर कर्मचाऱ्यांसाठी बांधलेले निवासस्थाने आहेत काही वर्षापासून बंद असलेल्या टीव्ही सेंटरचे रूपांतर एफएम सेंटरमध्ये करावे अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे संबंधित खात्याकडे ही मागणी केली त्यांचे म्हणणे आहे तुमच्या खासदारांना मंत्र्याकडे पाठपुरावा करायला लावा आम्ही हा बदल करायला सज्ज आहोत खासदार डॉ प्रीतम ताई कडे अनेक वेळा नागरिकांनी निवेदने दिली निवेदन देताना खासदार एवढेच म्हणतात पाहते ,बोलते, बघते एवढ्या साध्या प्रश्नासाठी जनतेला, पत्रकारांना, संघटनांना निवेदने द्यावी लागतात दिले तरी आजपर्यंत खासदारांनी या प्रश्न बाबत पुढाकार का घेतला नाही हे मात्र अंबाजोगाईकरांना आजपर्यंत समजलेले नाही टीव्ही सेंटर मधून एफएम सेंटरमध्ये रूपांतर झाले तर याचा लाभ फक्त अंबाजोगाई तालुक्यातील जनतेलाच नाही तर बीड, लातूर ,उस्मानाबाद या तीन जिल्ह्यातील जनतेला फायदा होणार आहे अजूनही वेळ गेलेली नाही आताही खासदार डॉ प्रीतम ताई मुंडे यांनी प्रयत्न केला तर शेवटच्या क्षणी का होईना अंबाजोगाईच्या टीव्ही सेंटरचे एफएम सेंटरमध्ये रूपांतर होऊ शकते प्रश्न आहे प्रयत्न करण्याचा !
आगामी काही महिन्यात लोकसभेच्या निवडणुका लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे त्या दृष्टीने पुन्हा खासदार डॉ प्रीतम ताई मुंडे अंबाजोगाई शहरातील काही ठराविक प्रमुख भाजप समर्थकांच्या घरी भेटी देऊन गेल्या केजच्या माजी आमदार संगीता ताई ठोंबरे यांच्या भोवती सावलीसारखे फिरणारे भाजपाचे कार्यकर्ते होते काहींनी बदलत्या परिस्थितीनुसार आपल्यात बदल करून घेत कॉम्प्रमाईज केला मुख्य प्रवाहात आले मात्र अनेकांना अजून मार्गच सापडला नसल्याचे दिसते अशापैकी ठोंबरेचे निष्ठावंत भाजप कार्यकर्ते अमित जाजू यांच्या घरी खासदार डॉ प्रीतम ताई मुंडे यांनी भेट दिली त्या अगोदर एक दिवस त्यांच्याकडे बीडच्या कुटे ग्रुपच्या कुटे मॅडम येऊन गेल्या असल्याचे समजते बीडमध्ये लोकसभेचे तिकीट कोणाला मिळणार अशी चर्चा सुरू असताना कुटे ग्रुप आर्थिक अडचणीत आला आहे दुसरीकडे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे जीएसटी प्रकरण असो नाहीतर आता तर वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता थकीत कर्जप्रकरणी जाहीर लिलाव या घटनेमुळे भाजपाने जनतेत काय मेसेज जायचा तो दिला आता लोकसभेच्या उमेदवारीचे काय ?अशीही चर्चा सुरू झाली आहे काहीही असो टीव्ही सेंटरचे रूपांतर एफएम सेंटरमध्ये करण्याचा निर्णय नभोवाणी खात्याला खासदार डॉ प्रीतम ताई मुंडे यांनी घ्यायला लावून अंबाजोगाईकरांना दिलासा द्यावा अशी ही जनतेतून मागणी होत आहे बघू या खासदार डॉ प्रीतम ताई मुंडे काय भूमिका घेतात ते !