धानोरा,पाटोदा येथील नियोजित उद्घाटनाचे कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय झाल्यानंतर सोशल मीडिया वर व्हायरल झालेली पोस्ट जशीच्या तशी

.
बीड जिल्ह्याच्या खासदार आदरणीय प्रीतमताई मुंडे व केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ नमिताताई मुंदडा यांनी वारंवार मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी समर्थनच केलेले आहे व पुढील काळातही मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी भावना आदरणीय ताई साहेबांची आहे. मराठा समाजाच्या मतदारसंघात होत असलेल्या आंदोलनासाठी वारंवार आपला पाठिंबा आमदार व खासदार ताईंनी दाखवलेला आहे.
अंतरवाली येथे झालेल्या आदरणीय जरांगे पाटलाच्या सभेसाठी जाणाऱ्या मराठा आंदोलकांसाठी आदरणीय नंदकिशोरजी मुंदडा साहेब यांनी सकाळी सहा वाजल्यापासून ते अंतरवाली वरून वापस येईपर्यंत येणाऱ्या सर्व आंदोलकांना अल्पोपहार व पाण्याची व्यवस्था केली होती तसेच अंबा साखर सहकारी साखर कारखाना येथे झालेल्या सभेसाठी 24 हजार लिटर पिण्याच्या पाण्याच्या बॉटलची व्यवस्था केली होती व बोरी सावरगाव येथे झालेल्या सभेस सुद्धा पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था केली होती. व आर्थिक मदतही केली होती,त्यामुळे माझे असे मत आहे की आपल्या जिल्ह्याच्या खासदार व आपल्या विधानसभेचे आमदार या सर्व समाजाच्या सुखदुःखात सामील असतात .आदरणीय ताईसाहेब आपण पाटोदा ते अंजनपूर, व धानोरा ते तट बोरगाव या गावच्या रस्त्याच्या विकासासाठी तसेच तट बोरगाव येथील मांजरा नदीवर पुलासाठी, तसेच पाटोदा येथील 33 केवी सबस्टेशन साठी, पाटोदा येथे होळणा नदीवरील बंधाऱ्यासाठी आपण प्रस्ताव दाखल केला, कारखाना ते देवळा रोड साठी मतदार संघाचा विकास व्हावा यासाठी करोडो रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला व त्यातली बरेच कामे झाली.बीड जिल्ह्याच्या खासदार आदरणीय प्रीतमताई मुंडे यांच्या नेतृत्वात विकास कामाचा उद्घाटनाचा कार्यक्रम दोन दिवसापासून संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये चालू आहेत या सर्व कामांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमांना उस्फूर्तपणे सर्व स्तरातून प्रतिसाद मिळत आहे. आज दिनांक 8 जानेवारी रोजी अंबाजोगाई तालुक्यातही मौजे धानोरा व मौजे पाटोदा या ठिकाणी पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत असलेल्या कामाचे उद्घाटन हे बीड जिल्ह्याच्या दबंग खासदार आदरणीय प्रीतमताई मुंडे यांच्या शुभहस्ते व केज विधानसभेच्या आमदार यांच्या उपस्थितीत पार पडणार होते परंतु या भागातील मराठा आरक्षण समर्थक कार्यकर्ते यांनी बैठक घेऊन हा कार्यक्रम कसा होणार नाही याची तयारी काल रात्रीपासून केलेली आहे अशा विकास कामांना विरोध असेल सदरील कामांचे उद्घाटन न झाल्यामुळे जर उद्या मराठा आरक्षणासंदर्भातला अध्यादेश उद्या निघणार असेल तर मलाही त्यात आनंदच आहे सदरील भूमिपूजनाचा सोहळा हा आपण सर्वांनी आनंद व्यक्त करण्याचा हा होता जर हा विरोध होत असेल आणि जर समाजात तेड निर्माण होत असेल तर सदरील सोहळा आपण आज न घेता सदरील सोहळा पुढील काळात आयोजित करू. आदरणीय खासदार ताई व आदरणीय आमदार ताई या आपल्या आनंद सोहळ्यात आपला आनंद द्विगुणीत करण्यासाठी सामील होणार होतात . मौजे पाटोदा व धानोरा येथे होत असलेला भूमिपूजनाचा कार्यक्रम हा शासकीय कार्यक्रम होता.. या कार्यक्रमाला राजकीय वळण देण्यात आले. आदरणीय ताईसाहेब आम्ही आपल्या स्वागतासाठी मौजे पाटोदा व धानोरा या ठिकाणी खूप जय्यत तयारी केलेली होती पण समाज भावनेचा आदर करून आपण समाजा समाजात तेढ निर्माण होऊ नये म्हणून आमच्या विनंतीला मान देऊन आजचा आपला भूमिपूजनाचा कार्यक्रम पुढे ढकलून बहुमूल्य असा एक आदर्श आपण घालून दिलात त्याबद्दल मी आपला कायम ऋणी आहे. आम्ही आपल्या सोबत सदैव आहोत.....
आपला आज्ञाधारक..
शिरीषकुमार मुकडे..