आमदार रोहित पवार यांच्यावर सूडबुद्धीने होत असलेल्या कार्यवाहीचा राष्ट्रवादीतर्फे निषेध

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी )-
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपाने फोडल्यानंतर भाजपाला वाटले आता राष्ट्रवादी पक्ष संपला मात्र राष्ट्रीय नेते शरद पवार साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवत आमदार रोहित दादा पवार यांनी राज्यभर संघर्ष यात्रेच्या माध्यमातून जनतेत जागृती निर्माण केली असल्याने भाजपाचे पित्त सध्या खवळले की काय कोण जाणे मात्र त्यांच्या संस्थेवर कार्यवाही करण्यासाठी भाजपा सत्तेचा दुरुपयोग करत आहे या कार्यवाहीचा निषेध अंबाजोगाई तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केला आहे
उपजिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की आमदार रोहित दादांनी संघर्ष यात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे युवकांचे विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नावर महाराष्ट्रात आवाज उठवला जनतेत संघर्ष यात्रेचा परिणाम दिसू लागताच राजकीय आकसा पोटी बारामती ॲग्रो या कंपनीवर विविध ठिकाणी ईडीच्या मार्फत धाडी टाकून नामोहरम करण्याचा प्रयत्न केला जात आहे सूडबुद्धीने केलेले राजकारण पवार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारा कोणताही कार्यकर्ता नेता खपवून घेणार नाही सूडबुद्धीने सुरू असलेल्या कार्यवाया तात्काळ बंद कराव्यात अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष अमर देशमुख यांनी दिला आहे
निवेदनावर तालुकाध्यक्ष अमर देशमुख सह शहराध्यक्ष शेख रौफ भाई, बालाजी शेरेकर, प्रशांत पवार, यशोधन लोमटे, सिद्धू लोमटे, रणजीत जोगदंड, शेख मुख्तार पाशा, व्यंकट मुंडे, शेख अकबर अली, भगवान ढगे अंकुशराव ढोबळे,तानबा लांडगे सुधाकर जोगदंड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत