आ.नमिता मुंदडा यांच्या उपस्थित भारतीय जनता पक्षात युवकांचा पक्ष प्रवेश

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी)-
देशात आणि महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून सर्वांगीण विकासाची कामे होत आहेत. त्यामुळे निश्चितचं जनसामन्यांमध्ये आपल्या महायुतीच्या सरकारच्या पारदर्शक आणि विकासात्मक कारभाराबद्दल सकारात्मक भावना आहे. अंबाजोगाई शहरात आमदार नमिता अक्षय मुंदडा यांच्या माध्यमातून शहरात विविध विकासकामे होत आहेत.
आमदार नमिता अक्षय मुंदडा, जेष्ठनेते नंदकिशोर मुंदडा,युवानेते अक्षय मुंदडा यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून युवक सामाजिक कार्यकर्ते
ॲड अरविंद जीवनराव मोटेगावकर यांच्यासह मधुकर बिडवे,गोपाल ठोंबरे,राम राऊत, लखन दहीवाळ ,अनिल पनसंगे,आनंद राऊत,शाम गित्ते, सुनील उपाडे, सुरज कचरे,महादेव कांबळे, समाधान गंगणे, सतीश काळे,दिपक कुडके,बाळासाहेब काळे यांनी प्रवेश केला
या पक्षप्रवेशवेळी आ.नमिता अक्षय मुंदडा,जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, माजी नगराध्यक्ष महादू मस्के, माजी सभापती मधुकरराव काचगुंडे, माजी नगरसेवक प्रशांत आदनाक, युवामोर्चा शहराध्यक्ष संजय गंभीरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.