पत्रकारांनी सकारात्मक पत्रकारीतेच्या माध्यमातून अंबाजोगाईचा नावलौकिक वाढवला.-डाॅ.अतुल देशपांडे


.
अंबाजोगाई (प्रतिनिधी) :- अंबाजोगाई हे शिक्षणातील माहेर घर म्हणून ओळखले जाते.त्याचबरोबर गुणवंत,किर्तीवंत पत्रकारांमुळे अंबाजोगाईच्या नावलौकिकात भर पडली आहे.शहरातील पत्रकारांनी जनतेचे प्रश्न निर्भिड पणे मांडून समस्या मुक्त अंबाजोगाई करण्याचे सामाजिक उत्तरदायित्व पत्रकारांनी निभावले असे प्रतिपादन डाॅ.अतुल देशपांडे यांनी केले.खोलेश्वर माध्यमिक विद्यालयात दर्पण दिनाच्या निमित्ताने आयोजित पत्रकार गौरव कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी मंचावर शालेय समिती सदस्य तथा पत्रकार अविनाश मुंडेगावकर व मुख्याध्यापक तथा केंद्रीय कार्यकारिणी सदस्य बाबुराव आडे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात प्रतिमा पुजनाने करण्यात आली.नंतर मंचावरील मान्यवरांच्या हस्ते पत्रकार प्रशांत बर्दापुरकर,रमाकांत पाटील,प्रकाश लखेरा,गजानन मुंडेगावकर,राहुल देशपांडे,गोविंद खरटमोल,दिलीप अरसुडे,अभिजीत लोमटे,विरेंद्र गुप्ता,व्यंकटेश जोशी,शिवकुमार निर्मळे,अशोक कचरे,दादासाहेब कसबे,अ.र.पटेल,शेख,अतुल जाधव,
यांचा सन्मानचिन्ह,पेन व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विरेंद्र गुप्ता,प्रशांत बर्दापुरकर,अविनाश मुंडेगावकर यांनी आपले मार्गदर्शन पर मनोगत व्यक्त केले.त्यानंतर खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आडे सर यांनी उपस्थित सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन,प्रास्ताविक केदार वाघमारे यांनी केले तर आभार प्रदर्शन विवेक जोशी यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक बाबुराव आडे,उपमुख्याध्यापक अरूण पत्की, पर्यवेक्षक सूर्यकांत उजगरे,पर्यवेक्षक प्रशांत पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.