पत्रकार भवना साठी कायम स्वरुपी जागा कधी मिळेल ?

.
आज सहा जानेवारी दर्पण दिवस अनेक मित्र, राजकीय पक्षातील कार्यकर्ते, नेते नव्हे सर्वांनी आजच्या दिनी पत्रकारांना शुभेच्छा देताना लोकशाहीचा चौथा खांब वगैरे अनेक बिरुदावली लावली होती हे वाचताना थोडा संकोच झाला आजच्या दिनी व्यक्त झाले पाहिजे असे वाटले म्हणून व्यक्त होत आहे
पत्रकार सतत ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांची बाजू घेऊन अन्याय करणाऱ्या विरुद्ध लढत असतात लढत असताना जो अन्याय करतो त्याने समाजसेवेचा बुरखा पांघरलेला असतो त्यामुळे सर्वसामान्य माणूस याला ओळखू शकत नाही अलीकडे नवाच फंडा राजकीय नेत्यांनी पाडलाय राजकारण करताना प्रत्येक गावात,शहरात ते आपला गट तयार करतात त्या माध्यमातून आपली राजकीय वाहवा मिळवतात अथवा त्या गावात, वार्डात तो गट वाहवा करतो अलीकडे पत्रकारिता क्षेत्रातही याचीच पुनरावृत्ती होत आहे असे वाटते होते का नाही सर्वांना ठाऊक आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे आंबेजोगाईचे उदाहरण घ्यायचे तर पत्रकारांनी जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडली प्रश्न मार्गी लागले गेली अनेक वर्षापासून अंबाजोगाई पत्रकार भवनाचा प्रश्न रेंगाळला आहे दरवेळी गोंडस आश्वासन देऊन नेते टाळ्या मिळवतात आजही पत्रकार भवनांचा प्रश्न सुटलेला नाही पत्रकार स्वतःचे प्रश्न सोडवू शकत नाहीत हे सत्य स्विकारायला काय अडचण आहे ? आज दर्पण दिन आहे आजच्या दिनी सत्य स्वीकारलेच पाहिजे असे वाटते अगोदर आपला प्रश्न सोडवणे महत्त्वाचे आहे आजच्या दिनी पत्रकारांनी पत्रकार भवनाचा कायमस्वरूपी प्रश्न सोडवण्यासंदर्भात संकल्प करावा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे मात्र किमान अंबाजोगाईच्या पत्रकार भवनांचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्व पत्रकारांनी हा संकल्प केला तर प्रश्न मार्गी लागू शकतो हे तेवढेच सत्य आहे
अ.र.पटेल,अंबाजोगाई