श्री मुंकुदराज स्वामी यात्रेनिमित्त अंबाजोगाईत भव्य पशुप्रदर्शन

सब टायटल: 
पशुसंवर्धन विभाग बीड जिल्हा परिषद, व पंचायत समिती यांचा उपक्रम
Shet Shivar

.         अंबाजोगाई (प्रतिनिधी )-     
           आद्यकवी श्री मुंकुदराज स्वामी यांच्या यात्रेनिमित्त अंबाजोगाईत ८ जानेवारी सोमवार रोजी  पशुसंवर्धन विभाग बीड जिल्हा परिषद, व पंचायत समिती अंबाजोगाई यांच्या वतीने 
भव्य पशुप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
        तालुक्यातील पशुपालकांना पशुपालन करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे.या साठी 
प्रतिवर्षाप्रमाणे   याही वर्षी श्री मुकुंदराज स्वामी यात्रेनिमित्त पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद, बीड व पंचायत समिती अंबाजोगाई यांच्या संयुक्त सौजन्याने -सोमवार दि. ८ जानेवारी  रोजी मोंढा मैदान अंबाजोगाई येथे भव्य पशुप्रदर्शन आयोजीत करण्यात आले आहे.
              या पशुप्रदर्शनामध्ये उत्कृष्ट संकरीत गायी, लालकंधारी व देवणी जातीच्या उत्कृष्ट जनावरांचा सहभाग असणार आहे. या जनावरांची विविध जातीमधुन (नर-मादी) वयोमानानुसार विविध गट स्थापना करुन (एका गटात किमान १० जनावरे असने आवश्यक) उपस्थीत जनावरांच्या संख्येनुसार प्रथम,द्वितीय व तृतीय निवड करुन बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. सदर पशुप्रदर्शनासाठी सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत नाव नोंदणी करण्यात येईल. व ११ वाजेनंतर उत्कृष्ट जनावरांची निवड व बक्षीस वितरण कार्यक्रम होईल.
तरी सदर पशुप्रदर्शनास जास्तीत जास्त पशुधन व श्वान घेऊन यावेत असे आवाहान पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती अंबाजोगाई यांच्याकडुन करण्यात येत आहे.