महिलांच्या प्रश्नावर लढणारे अंबाजोगाई शहर व तालुक्यात महिला नेतृत्व नाही महिलादिनी कोणी संकल्प करेल ?

Sampadkiya

 

         बीड जिल्ह्यात आंबेजोगाईचे महत्व काय होते ही आता दंतकथा झाली आहे कारण अंबाजोगाई शहराचे जुने राजकारण होते जुने राजकारणी होते ते काहीच शिल्लक राहिले नाही राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्राचे काय झाले जाऊ द्या उद्या महिला दिन आहे किमान महिलांच्या प्रश्ना संदर्भात विचार केला तर एक काळ असा होता की बीड जिल्हाच  नव्हे तर मराठवाडा महाराष्ट्रात कुठेही महिला मुलीवर अन्याय करणारी घटना घडली तर त्याचे प्रतिबिंब सर्वात पहिल्यांदा अंबाजोगाई शहरात उमटायचे मोर्चा, निषेध ,निदर्शने व्हायची त्यामुळे अंबाजोगाईत काय झाले किंवा होईल याकडे महाराष्ट्रातील प्रशासकीय राजकीय सामाजिक क्षेत्रातील प्रमुख नेते अधिकारी पदाधिकारी यांचे लक्ष असायचे आजही आठवतात महिलांच्या प्रश्नावर झालेले मेळावे  हजारो महिला एकत्र येऊन मेळावे व्हायचे एवढेच नाही तर मानलोक संस्था डॉ लोहिया यांनी स्थापन केली मनस्विनी  प्रकल्पाच्या नावाखाली प्राचार्य शालाताई लोहिया यांनी राज्य देशपातळीवरचे महिला वरील अन्याय अत्याचाराविरुद्ध आवाज बुलंद करण्यासाठी सतत संघर्ष केला प्रचंड मोठे मिळावे घेतले त्या मेळाव्याला सुद्धा महाराष्ट्रतीलच नव्हे तर देश पातळीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांसाठी काम करणाऱ्या संघटनेच्या महिला प्रतिनिधीनी आंबेजोगाईच्या महिला मेळाव्याला हजेरी लावली होती हे विशेष !

                  कालांतराने शैलाताई लोहिया यांच्यानंतर महिला वरील अन्याय विरुद्ध लढणारे महिला नेतृत्व कोणीही पुढे आले नाही अशी चर्चा होत असताना अंबाजोगाई शहर पातळीवर का होईना वेणुताई महिला विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रतिभा देशमुख, शैलाताई लोहिया यांची मुलगी प्राध्यापिका अरुंधती लोहिया त्या अगोदर धुळे मॅडम कॉम्रेड उषाताई पोटभरे यांनी अनेक महिलांच्या प्रश्नावर प्रशासनाला निवेदने मोर्चे शिष्टमंडळ भेटून न्याय देण्याच्या मागण्या केल्या काही काळ गेल्यानंतर महिला मुलीवर झालेल्या अन्याय अत्याचाराच्या घटनेचा निषेध करणारी संघटना सोडा महिला नेतृत्वच कुठे दिसत नाही बीड जिल्ह्यात अंबाजोगाई महिलांसाठी सुरक्षित शहर गनले जायचे परळी शहरातील अनेक पालक आपल्या मुलींना शिक्षणासाठी अंबाजोगाई शहरात येऊन राहत असायचे इतर ठिकाणी काय होते यापेक्षा अंबाजोगाई शहर अथवा तालुक्याची काय अवस्था आहे चर्चा न केलेली बरी आता तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण आहे नगरपरिषद, पंचायत समितीमध्ये महिला आरक्षणावर महिला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येतात मूळ जो उद्देश आहे महिला वरील अत्याचार अन्यायाविरुद्ध महिला नेतृत्व महिला लोकप्रतिनिधींनी आवाज उठवायला हवा आज तोच उद्देश साध्य होत नाही असेच दिसते असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही महिला, मुली वरील अत्याचार अन्यायाच्या घटना पूर्वी घडत होत्या ती परिस्थिती आज अजिबात नाही असेही नाही त्यावेळी अन्याय अत्याचारविरुद्ध लढायची गरज होती आज तशी गरज नाही अशी परिस्थिती नाही आजही आंबेजोगाई शहर व तालुक्यासह ग्रामीण भागात दररोज अन्याय अत्याचाराच्या घटना घडत आहेत त्या घटनेचा साधा निषेध करायला कोणीही पुढे धजावत नाही संघर्ष करणारे महिला नेतृत्व साधे शहरात नाही तालुकास्तरावर दिसत नाही कोणाकडून अपेक्षा करणार दोन-तीन दिवसापूर्वी तालुक्यातील एका खेड्यात सहा वर्षाच्या मुलीवर साठ वर्षाच्या व्यक्तीने चॉकलेटचे आमिष  दाखवून अन्याय केल्याची घटना निषेधार्थ  आहे त्यासाठी महिलांनीच निषेध केला पाहिजे असे नाही एकाही राजकीय पक्षाच्या स्थानिक पातळीवरील संघटने कडून या घटनेचा साधा निषेध केला गेला नाही समाजातील अशा विकृतींना वेळीच ठेचले पाहिजे भविष्यात कोणीही अशी हिम्मत करू नये

        निवडणूक लढवून निवडणूक निवडून येणाऱ्या महिला लोकप्रतिनिधीची सामाजिक जबाबदारी काही आहे की नाही ?मतदारांनी यासाठी निवडून दिले  तीही जबाबदारी पडली पार पाडली जात नाही अन्याय अत्याचारविरुद्ध पुढाकार घेणे ही सामाजिक जबाबदारी आहे प्रत्येक जण निवडून आले की कार्यकाळ संपेपर्यंत जनतेत मिरवायचे कार्यकाळ संपला  की आमच्या हातात काय ? असा उलट जनतेलाच प्रश्न करायचा ही पद्धत रूढ होत आहे महिला दिनी अंबाजोगाई शहर व तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलातून कोणीतरी या संदर्भात पुढाकार घेऊन समाजातील महिला व मुलीवर होणारे अन्याय अत्याचाराच्या घटनेविरुद्ध आवाज उठवण्यासाठी पुढे येण्याचा  निर्णय घ्यावा एवढीच यामागची अपेक्षा !