मराठवाडा दर्पण न्युज चॅनलच्या एका बातमीला (वन मिलियन ) दहा लाख वाचकाचा प्रतिसाद !


मराठवाडा दर्पण न्युज चॅनल सुरुवात करून अवघे सहा ते सात महिने झालेत चनई येथील खुनाची घटना चार महिन्यापूर्वी घडली होती त्या घटने नंतर संतप्त जमाव अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून बसला होता अशा नाजूक परिस्थितीत अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर मॅडम यांनी अत्यंत संयमी भूमिका निभावत महिला,पुरुष,तरुणांना विश्वास दिला त्या सर्व घडामोडी कॅमेऱ्यात कैद करून मराठवाडा दर्पण न्युज चॅनलच्या माध्यमातून वाचकांसमोर बातमी दिली ती बातमी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात वाचली गेली फक्त चनई घटनेच्या बातमीला राज्यातील (एक मिलियन) म्हणजे तब्बल (दहा लाख )वाचका पर्यंत ती बातमी गेली सात महिन्यात अनेक बातम्या आहेत दीड,दोन,अडीच हजार वाचकांनी बातमी वाचली हा दुग्ध शर्करा योग आमच्या पत्रकारिता काळातील सुखद आनंद देणारी घटना आहे अवघ्या सात महिन्यात मराठवाडा दर्पण न्युज चॅनलच्या वाचकांची संख्या लाखो मध्ये गेली सर्व वाचक,जाहिरातदार,हितचिंतक तसेच नवीन क्षेत्रात मदत करणाऱ्या सर्वांचे जाहीर आभार !
पत्रकारिता क्षेत्रात गेली अनेक वर्षापासून आम्ही कार्यरत आहोत विविध विभागीय दैनिकात कार्यरत आहोत गेली सात महिन्यांपूर्वी मराठवाडा दर्पण न्युज चॅनल सुरू केले अनेक वर्षापासून बातमीदारी केली डिजिटल मीडिया मध्ये जमेल का ? असा प्रश्न स्वतः ला विचारला निश्चय केला सुरुवात केली
प्रिंट मीडिया मध्ये सतत कोणत्याही सार्वजनिक प्रश्न घेऊन प्रश्न मार्गी लागल्याशिवाय पिच्छा सोडला नाही गेली सात महिन्यात डिजिटल मीडिया मध्ये सुरुवात केल्यानंतर कृषी विद्यालया समोरील रस्त्याचा प्रश्न असो की अंबाजोगाई ते येल्डा रस्त्याचा प्रश्न असो मांजरा नदीवरील पुलाची दुरावस्था,एस आर टी रुग्णालयातील विविध प्रश्नावर आवाज उठवला अनेक नव्हे बहुतांशी प्रश्न मार्गी लागले आम्ही दावा करत नाही आमच्यामुळेच सुटले लोकप्रतिनिधी,विविध राजकीय पक्षाचे नेते,कार्यकर्ते माहिती पुरवणारे सहकारी सर्वांचे श्रेय आहे