प्रियंका गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनात कार्यकर्त्यांमध्ये नवचेतना निर्माण केली

सब टायटल: 
बीड जिल्ह्यातील काँग्रेस नेतृत्व काँग्रेस पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करेल ?
Sampadkiya

 

               राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनात प्रियंका गांधी यांचे भाषण सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये नवचेतना निर्माण करण्याचे होते त्यांनी कार्यकर्त्यांना काँग्रेस पक्षाला तळागाळापर्यंत नेऊन काँग्रेस पक्षाची भूमिका समजावून सांगण्याची विनंती कार्यकर्त्यांना केली विशेष म्हणजे त्यांनी भारत जोडो यात्रा मध्ये ज्यांनी ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांची आठवण केली आम्ही हा मुद्दा यासाठी ठेवतो की या अधिवेशनाला बीड जिल्ह्याच्या खासदार रजनीताई पाटील याही उपस्थित होत्या त्यांच्यासोबत बीड जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख व राहुल भैया सोनवणे ही दोन तरुण नेतृत्व ही सोबत असल्याचे समजते

           दोन तरुण नेत्यांनी प्रियांका गांधीचे भाषण ऐकले असेल तर प्रश्न असा आहे किमान यापुढे तरी बीड जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाला मानणारा आजही वर्ग कायम आहे त्या काँग्रेस समर्थकांना न्याय देण्याचे तसेच जनतेच्या प्रश्नावर सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध आक्रमक भूमिका घेण्याची भूमिका बीड जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख,तसेच इतर नेते व खासदार घेणार आहेत का ?विशेष म्हणजे अलीकडे बीड जिल्ह्यामध्ये एक म्हण प्रसिद्ध आहे राजकारणात नेतृत्व पावरफुल व्हायचे असेल तर त्यासाठी साखर कारखाना, शिक्षण संस्था ,वेगवेगळे उद्योग नेत्याकडे असले पाहिजे खासदार पाटील यांच्याकडे केजचा  साखर कारखाना आहे प्रत्यक्षात कोणीही चालवत असेल तरी या कारखान्याचा शिक्का खासदार रजनीताई पाटील यांच्या नावानेच आहे व तो राहील त्यांच्या अधिपत्याखाली अनेक शिक्षण संस्थाही आहेत पूर्वी काँग्रेस पक्षामध्ये गटबाजीचे राजकारण सतत असायचे मात्र गटबाजी करणारेच काँग्रेसमध्ये नसल्यामुळे आता काँग्रेसमध्ये पाटील गटाच्या व्यतिरिक्त कोणीही नेतृत्व शिल्लक राहिलेले नाही त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष वाढला किंवा वाढला नाही याचे श्रेय खासदार रजनीताई पाटील, बीड जिल्ह्याचे काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनाच जाणार आहे हे सुस्पष्ट आहे आता प्रश्न आहे बीड जिल्ह्यामध्ये पक्ष वाढवाढवायचा तो कसा ? त्यांनी ठरवायचे आहे  आगामी काळात सर्वसामान्य जनतेच्या समोर कसा प्रयत्न होतो हे असणार आहे बघूया काय होते ते !