जिल्हा परिषदेच्या शिक्षकाच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमाला डझनभर पुढारी ?


बीड जिल्हा परिषदेतील शाळेत आपला पाल्य पाठवायला पालक सध्या तयार नाही सर्वच शाळेत ही परिस्थिती आहे असेही नाही अनेक जिल्हा परिषदेच्या शाळेचा आदर्श खाजगी शिक्षण संस्थेच्या शाळांनी घ्यावा असेही अनेक उदाहरणे असले तरी ती बोटावर मोजण्या एवढेच असतील मुळात प्रत्येक शिक्षकाला जिल्ह्यात तालुक्यात जमले तर स्वतःच्या गावाजवळ किमान अंबाजोगाई तालुक्यातील शाळेत नियुक्ती मिळावी ही अपेक्षा असते हे सर्व करायचे असेल तर त्याला राजकीय पाठबळ असणे अत्यंत आवश्यक असते ही सर्व जुळवाजुळव जिल्हा परिषदेचा शिक्षक अत्यंत चाणाक्षपणे करतो हे अनेक उदाहरणे आहेत त्यामुळे बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे शिक्षक हे जिल्हा परिषदेचे शिक्षक आहेत का राजकीय नेत्यांचे समर्थक ? आहेत असाच जणू सध्या पालकांना प्रश्न पडत आहे कारण कोणत्याही राजकीय नेत्याचा कार्यक्रम असला की त्या कार्यक्रमाच्या व्यवस्थेसाठी जिल्हा परिषद मध्ये कार्यरत असलेल्या अनेक शिक्षकांची धावपळ बघायला सर्वसामान्य जनतेला मिळत आहे एवढी धावपळ विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी घेतली तर अनेक जिल्हा परिषद शाळेमधून गुणवंत विद्यार्थी तयार होतील मात्र याकडे शिक्षक तर बघायला तयारच नाहीत शिक्षकावर अंकुश ठेवणारे शिक्षण विस्तार अधिकारी असो किंवा गटशिक्षणाधिकारी जिल्हा शिक्षणाधिकारी कोणीही शिक्षकांना जाब विचारायला तयार नाही त्यामुळे बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शैक्षणिक दर्जा संदर्भात अनेक वेळा तपासणीतून प्रश्नचिन्ह निर्माण झाला असला तरी याकडे बघायला कोणालाही वेळ नाही अशीच परिस्थिती दिसत आहे जिल्हा परिषदेच्या शाळेत असणारे अनेक असे शिक्षक आहेत ते आपल्या कर्तव्याशी कायम चिकटलेले दिसतात मात्र ही संख्या फार नाही जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना ही बाब दिसत असली तरी ते कोणत्याही शिक्षकाला जाब विचारू शकत नाहीत कारण जाब विचारला तर त्या शिक्षकांना पाठबळ देणारा नेता लगेच फोन करून त्या अधिकाऱ्यांना जाब विचारतो फक्त आमचाच शिक्षक दिसला का इतर शिक्षकांची यादी देऊ का ? तुम्ही करणार का त्यांच्यावर कार्यवाही ?त्यामुळे निमुटपणे अधिकाऱ्यांनाही गपचूप बसावे लागते दुसरीकडे कोणताच पक्षाचा राजकीय नेता अशा शिक्षकांबद्दल आक्षेप घेत नाही त्याचं कारण म्हणजे आक्षेप घेतला तर तो शिक्षक त्या नेत्याच्या निवडणुकीत सर्व ताकदीने विरोध करतो त्यामुळे कोणीही राजकीय नेते सुद्धा अशा शिक्षकांना विरोध करत नाहीत
बीड जिल्ह्याचे सोडा अंबाजोगाई तालुक्याचा विचार केला तरी अंबाजोगाई शहर तसेच मुख्य रस्त्यालगत असणाऱ्या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक एकाच तालुक्यात किती वर्षापासून ठाण मांडून बसलेत तपशील घेतला तर प्रत्येकाच्या लक्षात येईल अंबाजोगाई शहराच्या मध्यभागात असणारी जिल्हा परिषदेची शाळा हायस्कूल आहे दुसरी शाळा कन्या शाळा व इतरही शहरात शाळा आहेत शाळा बदलून आंबेजोगाई तालुका न सोडलेले अनेक शिक्षक सापडतील शाळेत विद्यार्थी कमी आहेत शिक्षकांचा भरणा जास्त आहे गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण शिकविले गेले नाही तरी राजकीय नेत्यांना फारसा फरक पडत नाही मात्र माझा समर्थक शिक्षकाला त्रास झाला नाही पाहिजे ही भूमिका असते स्वतःच्या शिक्षण संस्थेतील शिक्षकांना अशा सवलती द्या त्यानंतर समजेल शिक्षकांचे चुकीचे समर्थन किती करावे सोशल मीडियावर दोन दिवसापासून एक पत्रिका फिरत आहे एका जिल्हा परिषद शिक्षकाच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला आडसकर ,मुंदडा , मोदी ,दौंड ,साठे ,काळे, गटविकास अधिकारी ,शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, बीड जिल्हा परिषद मधील कार्यालयीन अधीक्षक, शिक्षण विस्तार अधिकारी व इतर मान्यवरांची उपस्थिती राहणार असल्याचे समजते एकदा आंबेजोगाई तालुक्यातील जिल्हा परिषद मधील शाळेतील शैक्षणिक गुणवत्तेवर असाच राजकीय कार्यक्रम आयोजित करून एकदा राजकीय नेते,शिक्षक,अधिकारी,सर्वांनी एकदा आत्मचिंतन करायला हवे अशीही जनतेतून मागणी होत आहे