बीड जिल्ह्यातील नेत्याच्या नगर जिल्ह्यात राजकीय जुगलबंदी


.
बीड जिल्ह्यातील नेत्याच्या नगर जिल्ह्यात राजकीय जुगलबंदी
अंबाजोगाई येथील एका बँकेच्या शाखेचे उद्घाटन नगर जिल्ह्यात आज होते नगर जिल्ह्यातील ज्या भाजप नेत्याच्या हस्ते हे उद्घाटन ठेवले होते उद्घाटकच न आल्यामुळे कार्यक्रमाच्या अध्यक्षांना उद्घाटक बनवावे लागले उद्घाटक धनंजय मुंडे व भाजप नेते रमेश आडसकर व्यासपीठावर उपस्थित होते भाजप नेते रमेश आडसकर यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला की आमच्याकडे वर मोदी आहेत खाली मोदी आहेत हाच संदर्भ पकडून बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी सुरुवातीला आपण कार्यक्रमाचे अध्यक्ष होतो उद्घाटक कसे बनलो ? हे कळलेच नाही अशी गुगली टाकत सदरील बँकेच्या अनेक शाखा आहेत मात्र परळी मध्ये शाखा का स्थापन केली नाही ? असा आजही आपल्याला प्रश्न पडतो असा उल्लेख धनंजय मुंडे यांनी केला विशेष म्हणजे अंबाजोगाईची श्री योगेश्वरी देवी व परळी येथील प्रभू वैद्यनाथ ही आख्यायिका माहित असून सुद्धा बँकेच्या संस्थापकानी परळीमध्ये बँकेची शाखा का उघडली नाही ? का परळीकरावर विश्वास नाही असाही सवाल उपस्थित केला त्यावेळी एकच हशा पिकला दुसरे महत्त्वाचे म्हणजे आडसकरांना त्यांनी केलेल्या वक्तव्याच्या उत्तरात आमदार धनंजय मुंडे म्हणाले आडसकर साहेब बीड जिल्ह्यामध्ये कोण कोणाची साथ सोडतोय हे लवकर कळत नाही मात्र नगर जिल्ह्यात तसे नाही इथे तातडीने भूमिका घेतली जाते तुमच्याकडे वर मोदी असले खालचे मोदी तुमच्या सोबत असले तरी आम्ही तुमची कधीही अडचण करू शकतो हे विसरू नका अशी राजकीय गुगली आमदार मुंडे यांनी टाकताच पुन्हा उपस्थितीतात खळखळून हशा पिकला बीड जिल्ह्यातील नेत्यांची नगर जिल्ह्यात जाऊन व्यासपीठावरची जुगलबंदीचा बीड जिल्हा वासियाना चांगलाच आस्वाद घेतला असेच म्हणावे लागेल !