डॉक्टर पती बेपत्ता असल्याची पत्नीची पोलिसांत तक्रार

गौतम बचुटे/केज :- केज येथुन खाजगी वैद्यकीय सेवा करणारा एक डॉक्टर बेपत्ता झाला असून या बाबत डॉक्टरांच्या पत्नीने पोलीस ठाण्यात नवरा हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
केज येथील शिला भानेद्र जाधव या केज येथील उपजिल्हा रुग्णालय केज येथे परिचारिका म्हणून सेवा करीत आहेत. त्या उपजिल्हा रुग्णालयाच्या सरकरी क्वार्टरमध्ये त्यांच्या कुटुंबासह एकत्र राहात आहेत. त्यांना एक मुलगी व एक मुलगा असे दोन अपत्ये आहेत. त्यांचे पती डॉ. भानेद्र जाधव हे बोरीसावरगाव ता. केज येथे खाजगी सेवा करीत आहेत. त्यांचे कळंब अंबाजोगाई रोडवर बोरीसावरगाव येथे गणपती हॉस्पिटल नावाचे हॉस्पिटल सुरू आहे.
दरम्यान दि. १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६:०० वा. डॉ. भानेद्र जाधव वय (३९ वर्ष) रोजी सायंकाळी ६:०० वा. सुमारास ते सरकारी दवाखान्याच्या क्वार्टर मधून कोणाला काही एक न सांगता घरातुन निघुन गेले आहेत. तसेच त्यांनी त्यांच्या मोबाईलचे सिम कार्डही काढून ठेवले आहे. त्यांच्या पत्नी शिला जाधव यांनी त्यांच्या मूळ गावी अहमदनगर जिल्ह्यातील मानोरी या गावात नातेवाईकांकडे फोनद्वारे विचारणा केली. मात्र ते आढळून आले नाहीत.
म्हणून दि.२२ फेब्रुवारी रोजी शिला भानेद्र जाधव यांनी केज पोलीस ठाण्यात पती डॉ. भानेद्र जाधव बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे.