शिवीगाळ, मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्या ह्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली.

अंबाजोगाई (प्रतिनिधी )-
येथिल ३ रे जिल्हा व सत्र न्यायालयात सत्र केस. क्र. २०/२०२० सरकार वि.बाबुराव व इतर या प्रकरणाची सुनावणी होऊन आरोपी आरोपी १.बाबूराव ऊर्फ पप्पू मोहन गित्त,२.मोहन सौदागर गित्ते ३.दत्ता मोहन गित्ते सर्व रा. तळनी ता.अंबाजोगाई जि. बीड याची कलम ३०७,३२४,३२३,५०४,५०६ ३४ भा. दं. वि. मधून मा. न्या.व्ही. के.मांडे साहेब यांनी सबळ पुराव्या अभावी दि.०२/०२/२०२३ रोजी निर्दोष मुक्तता केली.
सदरील प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की, फिर्यादी दत्तात्रय कोंडीबा गित्ते मौजे तळणी यांनी फिर्याद दिली की,दिनांक ०४/०४/२०१८ रोजी घडलेल घटनेसंदर्भाने फिर्यादी यांनी दिनांक ०५/०४/२०१८ रोजी परळी ग्रामीण पोस्टे येथे फिर्याद नोंदविली. सदर गुन्हया तपासात तत्कालीन तपास अधिकारी श्री एस. एस. चाटे पोलीस निरीक्षक यांनी दोन शासकीय पंचांसमक्ष घटनास्थ पंचनामा केला आहे. साक्षीदारांकडे तपास केला आहे. आरोपीतांना अटक करून त्यांचेकडे तपास केल आरोपीकडून गुन्हयात वापरलेले हत्यार शासकीय पंचांसमक्ष भारतीय पुरावा कायदा कलम २७ प्रमाणे हस्तगत के आहे. जखमीचे वैद्यकीय प्रमाणपत्र हस्तगत केले आहे. सदर गुन्हयात विधीसंघर्षग्रस्त बालक असून त्यास ताब्या घेवून मा. अध्यक्ष बाल न्यायमंडळ बीड यांचे समक्ष हजर केले आहे.झाले तपासावरून यातील आरोपीतांनी व विधी संघर्षग्रस्त बालकाने संगनम करून रोडचे कामाचे कारणावरून यातील फिर्यादी व सक्षीदार यांना जीवे मारण्याचे उद्देशाने मारहान करून जखम केले आहे. व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे हे झाले तपासावरून निष्पन्न होत असल्याने वर नमुद आरोपीतांविरूध्द कलम ३०७, ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ भादवि प्रमाणे गुन्हा केल्या दोषारोप आहे. केली व जिवे मारण्याची धमकी दिली अशा प्रकारची फिर्याद दिल्यावरून आरोपी यांच्या विरोधात पोलीस स्टेशन परळी ग्रामीण येथे वरील कलमा अनव्ये गुन्हा दाखल करून प्रकरण सुनावणी साठी मा. न्यायालयात वर्ग करण्यात आले.
सदरील प्रकरणाची सुनावणी मा.न्यायालयात झाली असता फिर्यादी तर्फे ५ साक्षीदार तपासण्यात आले.फिर्यादी पक्ष गुन्हा सिद्ध करू न शकल्यामुळे व आरोपीच्या वकिलाचा बचाव गृहीत धरून आरोपी १.बाबूराव ऊर्फ पप्पू मोहन गित्ते,२.मोहन सौदागर गित्ते ३.दत्ता मोहन गित्ते सर्व रा. तळनी ता.अंबाजोगाई जि. बीड याची कलम ३०७,३२४,३२३,५०४,५०६ ३४ भा. दं. वि. मधून मा. न्या.व्ही. के.मांडे साहेब यांनी सबळ पुराव्या अभावी दि.०२/०२/२०२३ रोजी निर्दोष मुक्तता केली.
सदरील प्रकरणात आरोपी तर्फे ॲड राहुल मुंडे व दिलीप चामनार यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड अनंत सोनवणे यांनी काम पाहिले.