शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार काळेंनी निवडून येण्याचा पुन्हा केला विक्रम

सब टायटल: 
भाजपाचे उमेदवार नावात पाटील असूनही विजयाचा किरण उग्वण्या अगोदर मावळतीला गेले
Rajkiya

 

अंबाजोगाई (प्रतिनिधी)- 

 काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या तीन पक्षासह इतर मित्र पक्षाचे मिळून असलेली महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार विक्रम काळे यांनी विधानपरिषद निवडणुकीत निवडून येण्याचा पुन्हा एकदा विक्रम केला आहे दुसरीकडे भाजपाचे उमेदवार प्राध्यापक किरण पाटील हेच आघाडीच्या उमेदवाराचा पराभव करू शकतात आघाडीतील मित्र पक्षाच्या नेत्यांनी भाजपा नेत्यांना पटवून दिल्याने भाजपात प्रवेश करताच किरण पाटलांना उमेदवारी जाहीर झाली मात्र नावात पाटील असूनही निवडणुकीत विजयाचा किरण ऊगवण्या अगोदर मावळतीला तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेल्याने भाजपामध्ये आता पराभवाचे आत्मचिंतन व्हायला हवे अशी कार्यकर्त्यातून मागणी जोर धरू लागली आहे

      राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिक्षक मतदार संघातील आमदार विक्रम काळे व आमदार सतीश चव्हाण असे दोन राष्ट्रवादीचे आमदार आहेत की त्यांनी अजूनही आपल्या नेतृत्वाला आपल्या मतदारसंघात सक्षम पर्याय कामाच्या माध्यमातून निर्माण होऊ दिलेला नाही असेच म्हणावे लागेल त्यासोबत या दोन्हीही आमदारांना निवडून येण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मतदाराची नोंदणी तसेच निवडून आल्यानंतर मतदारांच्या समस्या आमदारापर्यंत नेऊन त्या सोडऊन घेण्यासाठी मध्यस्थीची भूमिका निभावणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ नरेंद्र काळे यांची ही भूमिका सतत महत्त्वाची असते व या दोन्हीही आमदारासाठी उपयुक्त ठरलेली आहे यावेळी ही विक्रम काळे यांच्या बद्दल प्रचंड नाराजी आहे असा आभास निर्माण केला गेला मात्र मतदार कोण आहेत त्यांचे प्रश्न काय आहेत मतदारांशी थेट संपर्क डॉ नरेंद्र काळे यांचा असल्याने भाजपाच्या उमेदवाराला खऱ्या मतदारापर्यंत शेवटपर्यंत पोहोचता आले नाही अशीही आता चर्चा होऊ लागली आहे

        भाजपाचे उमेदवार प्रा किरण पाटील संस्थाचालक आहेत विशेष म्हणजे ते काँग्रेस पक्षात यापूर्वी कार्यरत होते त्यामुळे काँग्रेस पक्षाला मानणारा वर्ग आपल्या उमेदवारांना मते देईल असा अहवाल भाजप नेतृत्वाकडे गेल्याने भाजप नेतृत्वाने प्रा किरण पाटील यांना शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी दिली असल्याचे समजते प्रा किरण पाटील बीड जिल्ह्यातील एका खासदाराचे जवळचे नातेवाईक असल्याने बीड जिल्ह्यातील दुसऱ्या खासदाराची साथ मिळेल का ? अशा  शंका कुशंका व्यक्त होत असताना जिल्ह्यातील दुसऱ्या खासदारच नाही तर भाजपाच्या राष्ट्रीय सचिव यांना सोबत घेऊन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बीड जिल्ह्याचा प्रचार दौरा केला त्यामुळे किंतु परंतु ला जागाच राहिली नाही भाजपा उमेदवार प्रा किरण पाटील यांच्यासाठी भाजपातील संस्थाचालक नेत्यांनी निवडून आणण्यासाठी अथक परिश्रम केले एवढेच नाही तर महाविकास आघाडीतील महत्त्वाचा घटक असणाऱ्या पक्षाचे नेते कार्यकर्ते तोंडाला रुमाल बांधून भाजप उमेदवाराच्या प्रचारात सक्रिय सहभागी झाले होते प्रचारावेळी आंबेजोगाईत महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार विक्रम काळे आले असता सभा वेणूताई महिला महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित केली होती त्यावेळी स्वतः उमेदवार विक्रम काळे यांनी भाषण करताना राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष हजर आहे शिवसेनेचे नेते व्यासपीठावर उपस्थित आहेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुखांची निवडणूक संपत आली तरी भेट झाली नाही किंवा फोन झाला नाही कोणत्या कामात व्यस्त आहेत हे मात्र कळलेच नाही असाही जाहीर सभेतून टोला उमेदवारांनी लगावला होता त्यावरून बरीच चर्चा राजकीय क्षेत्रात रंगली प्रचारात काँग्रेस पक्षाचा एकही प्रमुख नेता का नाही ? अशीही चर्चा त्यावेळी रंगली होती

           प्रचारादरम्यान महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षाचे नेते तसेच त्यांच्या संस्थेतील कर्मचारी मराठवाड्यातील इतर जिल्ह्यात दिसले अशीही चर्चा मध्यंतरी निवडणुकीदरम्यान सुरू झाली मात्र यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कोणत्याही प्रमुख नेत्याने मित्र पक्षातील नेत्याच्या हालचाली लक्षात येऊन सुद्धा कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही अथवा दखलही घेतली नाही निवडणूक झाली निकाल लागला निकालानंतर शिक्षक मतदार संघाचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर तर भाजपाचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर गेला असल्याने महाविकास आघाडीतील नेते म्हणत आहेत अगोदरच ते अदखलपात्र होते म्हणून मित्र पक्षातील नेते झपाटून भाजप उमेदवाराच्या प्रचाराला लागले असले तरी आम्हाला हे माहीत असून सुद्धा आम्ही त्यांची फारशी दखल घेतली नाही अशा खोचक प्रतिक्रिया आता व्यक्त होत आहेत

भाजप उमेदवाराच्या पराभावाला जबाबदार कोण ?

               शिक्षक मतदार संघाचे भाजप व मित्र पक्षाचे उमेदवार प्रा किरण पाटील केंद्रात व राज्यात सत्ता भाजपची असूनही पक्षाचे अधिकृत उमेदवार ते होते मात्र निवडणूक निकालानंतर ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले पक्षाच्या उमेदवाराच्या पराभवाची जबाबदारी कोणाची ? असा आता भाजपातील नेते एकमेकाला सवाल करत आहेत कोणीही समोर येऊन केंद्रात व राज्यात सत्ता असूनही एवढा मोठा पराभव झाला त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपण पदावरून बाजूला होत आहोत अशी कोणीही भूमिका घ्यायला पक्षाचा पदाधिकारी तयार नाही भाजपातील नेत्यांना अगोदरच माहीत होते का आपल्या उमेदवाराचा पराभव होणार आहे त्यामुळे की काय कोण जाणे आत्मचिंतन तर सोडा भाजपाचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला याची भाजपाच्या एकाही नेत्याचा सुताराम संबंध नसल्यागत भूमिकेत असल्याचे दिसत आहेत अशी ही भाजप कार्यकर्त्यात दबक्या आवाजात चर्चा ऐकावयास मिळत आहे