जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या विषयी केलेल्या अवमानाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निवेदन देऊन केला तीव्र शब्दात निषेध

अंबाजोगाई (प्रतिनिधी )-
जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्यासह राष्ट्रीय महापुरुषांच्या बाबतीत एका विशिष्ट मानसिकतेतून सातत्याने होत असलेल्या अपमानास्पद भाषेचा वापर करण्याचे काम काही वाचाळवीर हे जाणीवपूर्वक करत आहेत समाज माध्यमावर धीरेंद्र शास्त्री ऊर्फ बागेश्वर नामक तोतयाने जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या विषयी केलेल्या अवमानाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आज उपविभागीय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी कार्यालय अंबाजोगाई यांना वाचाळवीर यांच्यावर कारवाई करण्यात यावी व या संदर्भात एक कडक कायदा करण्यात यावा जेणेकरून आशा बाबतीत पायबंद घातला जाईल असे निवेदन देण्यात आले.
सदरील निवेदनावर केज विधानसभा मतदारसंघाचे माजी आ पृथ्वीराज साठे, बबनराव लोमटे , राजपाल लोमटे, तालुकाध्यक्ष ताराचंद शिंदे, युवकचे तालुकाध्यक्ष प्रमोद भोसले, अविनाश उगले, डी एस सोळंके, गोविंदा पोतंगले दत्ता सरवदे,सुगत सरवदे , शहराध्यक्ष हमीद चौधरी , सुधाकर जोगदंड , अनिल पसारकर, तालुका कार्याध्यक्ष बालाजी शेरेकर, सिद्धू लोमटे ,सोमनाथ धोत्रे ,धर्मराज धुमाळ, विठ्ठल कोकरे ,धनराज सोनवणे ,गणेश मसने ,रमेश कदम, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीस अमृता काळदाते, अॅड. अविनाश धायगुडे, ख्वाजा खलील, काकासाहेब जामदर यांच्या सह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.