संत कबीर नगर मधील नाल्या चार महिन्यापासून साफ न केल्याने तुंबलेल्या अवस्थेतच !

सब टायटल: 
माजी नगरसेवक साठे निवडणुकी पुरते वॉर्डांत येतात भराडिया म्हणतात मी भाजपात गेलो तिसऱ्या नगरसेवकाचे नावच नागरिकांना आठवेना
Rajkiya

 

अंबाजोगाई (प्रतिनिधी )- 

अंबाजोगाई शहरातील सर्वात मोठा वार्ड म्हणजे वार्ड क्रमांक 14 या वार्डातून नगरपरिषदेवर दरवेळी तीन नगरसेवक निवडून येतात माजी आमदार साठे स्वतः दोन ते तीन वेळा निवडून आले त्यानंतर त्यांच्या सुविद्य पत्नी गेल्यावेळी निवडून आल्या होत्या मात्र तिन्ही माजी नगरसेवकांनी वार्डाला वाऱ्यावर सोडल्याने गेली चार महिन्यापासून या वार्डातील नाल्या तुंबल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे वार्डात रोगराई पसरल्याने नागरिक तापीने डोकेदुखीने त्रस्त झाले आहेत नगर परिषदेचा स्वच्छता विभाग याकडे पाहायला तयार नाही जनतेने जायचे कोणाकडे ? असा प्रश्न नागरिकांना पडत आहे

          अंबाजोगाई शहरातील इतर वार्डाच्या तुलनेत वार्ड क्रमांक 14 मध्ये दलित वस्ती योजनेअंतर्गत भरपूर निधी खर्च झाल्याचे रेकॉर्ड असले तरी प्रत्यक्षात आजही त्या भागातील समस्या कायम आहेत नव्हे तशाच रेंगाळत पडल्या आहेत सर्व भाग झोपडपट्टी म्हणून गणल्या जातो या वार्डातून सलग दोन-तीन टर्म माजी आमदार साठे स्वतः निवडून आले नागरिकांनी त्यांच्यासोबत इतर दोन नगरसेवकांना निवडून दिले दलित वस्तीच्या नावावर फंड भरपूर आला विकास मात्र झालाच नाही विकास कुठे गेला माजी नगरसेवकांनाच माहीत सतत निवडून दिल्याने माजी आमदार साठे फक्त निवडणुकी वेळीच वार्डात येतात इतर वेळा वार्डाकडे डूकुनही  पाहत नाहीत अशी खंत नागरिकांनी बोलताना व्यक्त केली इतर दोन नगरसेवकापैकी दिनेश भराडीया यांच्याकडे नागरिक तक्रार घेऊन गेले तर मी भाजपामध्ये गेलो त्यामुळे माझे नगर परिषदेत कोणी ऐकत नाही असे सांगून टाळू लागले तर तिसरा नगरसेवक कोण ? असे विचारले असता नागरिकांना तिसऱ्या नगरसेवकांचे नाव सुद्धा आठवले नाही सध्या कबीर नगर भागातील नाल्या अनेक ठिकाणी तुंबल्या आहेत विशेष म्हणजे याच नाल्यातून पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन आहे लिकेज पाईपलाईन मधून नागरिकांना पाण्याचा पुरवठा होत असल्याने रोगराई यामुळे सुद्धा पसरू शकते अशी भीती नागरिकांनी बोलताना व्यक्त केली

          वॉर्ड क्र  14 मध्ये दलित वस्ती योजनेअंतर्गत करोडो रुपयांचा निधी खर्च झाल्याचे नगरपरिषद प्रशासन म्हणत असले तरी आजही या वार्डात अनेक ठिकाणी रस्ता नाही नाली नाही आहे त्या नाल्यात तुंबलेल्या चार-चार महिने नगरपरिषदचे सफाई कामगार या वार्डामध्ये येत नाहीत या भागाचे अनेक वर्षापासून प्रतिनिधित्व करणारे साठे फक्त न.प.च्या निवडणुकी वेळीच वार्डात येतात इतर वेळा येत नाहीत समस्या घेऊन गेले तर सांगतो बोलतो म्हणतात मात्र कृती होत नाही दुसरे माजी नगरसेवक भराडीया  कडे गेले तर मी भाजपा मध्ये गेल्याने नगरपरिषद मध्ये कोणी ऐकत नाही असे सांगून हात वर करतात तिसरा नगरसेवक कोण ? अशी विचारणा केली असता फार वेळ विचार करून सुद्धा नागरिकांना तिसऱ्या माजी नगरसेवकाचे नाव आठवत नाही सध्या या वार्डामध्ये नाल्या तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे सीओ साहेब उघडा डोळे बघा नीट या वार्डातील नागरिकांचे आरोग्य अबाधित होण्यासाठी वार्डातील नाल्याची सफाई करावी अशी मागणी जनतेतून केली जात आहे