अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक जाहीर ;29 एप्रिल रोजी होणार मतदान

सब टायटल: 
आमदार नमिता ताई मुंदडा विरुद्ध दौंड,साठे,मोदी असा सामना होऊ शकतो
Rajkiya

 

अंबाजोगाई (प्रतिनिधी )- 

अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर प्रशासकीय मंडळ अस्तित्वात आले होते त्याची मुदत संपली त्यानंतर मार्केट कमेटीवर प्रशासक आले आहे सद्या प्रशासकीय काळ सुरू आहे आता निवडणूक जाहीर झाली असून तशी प्रक्रिया 3 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे 27 मार्च रोजी निवडणूक निर्णय अधिकारी निवडणुकीच्या कार्यक्रमाची अधिकृत घोषणा करतील 29 एप्रिल रोजी मतदान होणार असून 30 एप्रिलला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल

            राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण,पुणे यांनी आज काढलेल्या आदेशात तपशीलवार कार्यक्रम दिला आहे त्यानुसार 3 फेब्रुवारी पासून निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे प्रत्यक्षात निवडणुकीचा अधिकृत घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी 27 मार्च रोजी घोषणा करतील 27 मार्च ते 3 एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे 5 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरलेल्या अर्जाची छाननी होईल 6 एप्रिल रोजी अंतिम उमेदवाराची यादी निवडणूक निर्णय अधिकारी लावतील 6 एप्रिल 20 एप्रिल पर्यंत उमेदवारी मागे घेण्यासाठी मुदत असेल 21 एप्रिल रोजी उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात येईल 29 एप्रिल रोजी मतदान होईल व 30 एप्रिल रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल असा असणार आहे अंबाजोगाई मार्केट कमेटी संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम 

   मध्यंतरी मतदार यादीत असणाऱ्या मतदारांवर आक्षेप नोंदवला होता त्या मतदारांना नोटीसा दिल्यानंतर न्यायालयात दाद मागितली होती न्यायालयाने तीन आठवड्याची मुदत दिली होती त्या प्रक्रियेचे काय झाले अद्याप समजले नाही मतदान यादी जाहीर झाल्यानंतर काय आक्षेप येतात यावर बरेच अवलंबून आहे सद्या तरी भाजप आमदार नमिता ताई मुंदडा गटा विरुद्ध माजी आमदार दौंड,साठे,मोदी असा सामना निवडणुकीत पहावयास मिळू शकतो