भारतीय जैन संघटनेच्या अध्यक्षपदी साहील मुथा यांची नियुक्ती

अंबाजोगाई (प्रतिनिधी)--
भारतीय जैन संघटनेच्या अध्यक्षपदी साहील मुथा यांची, सचीव पदी आदेश कर्नावट यांची तर जलसंधारण तालुका प्रमुख म्हणून भुषण विनोद मुथा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बीड जिल्ह्यातील बीजेएस च्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर भारतीय जैन संघटना(बीजेएस) च्या संघटनेच्या बीड जिल्हा व विविध तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या प्रदेशाध्यक्ष नंदकिशोर साखला , प्रदेश उपाध्यक्ष केतन शहा(सोलापूर),बीजेएस चे राज्य सचिव दीपक चोपडा,राज्य समन्वयक चंद्रशेखर चोरडिया,मराठवाड्याचे उपाध्यक्ष धनराज सोळंकी, यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या.
बीड जिल्हा अध्यक्षपदी निलेश चंदुलालजी ललवानी तर सचिव पदी प्रितम माणिकचंदजी खिंवसरा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बीड तालुक़ा अध्यक्ष -प्रवीन पोपटलालजी लुनावत, सचिव -वर्धमान विजयकुमार खिंवसरा , बीड शहर अध्यक्ष -सुहास सुरेशलाल मुनोत, सचिव-आशिष सुशिलजी खटोड, अंबाजोगाई अध्यक्ष -साहिल सुनिल मुथा, सचिव -आदेश आनंदजी कर्नावट, अंबाजोगाई तालुका जलसंधारण प्रमुख —भुषण विनोद मुथा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदरील निवडीबद्दल साहील मुथा, आदेश कर्नावट आणि भुषण मुथा व इतरांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.