उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पदभार देण्याची ट्रस्टी करणार पदसिद्ध अध्यक्ष कडे मागणी

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी )-
छत्रपती संभाजीनगर येथील मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात 2016 च्या ट्रस्टीनी नऊ महिन्याच्या कालावधीपर्यंत काळजीवाहू ट्रस्टी म्हणून काम पाहावे असे आदेश दिले आहेत त्यानुसार ॲड शरद लोमटे, भगवानराव शिंदे ,गिरधरलाल भराडीया ,कमलाकर चौसाळकर माजी आमदार साठे, पापा मोदी, अशोक लोमटे हेही त्या ट्रस्टी मध्ये आहेत विद्यमान ट्रस्टीकडून पदभार मिळावा म्हणून उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बहाल झालेले ट्रस्टी आज पदसिद्ध अध्यक्ष असणारे तहसीलदार यांच्याकडे लेखी अर्जाद्वारे मागणी करणार असल्याचे समजते
योगेश्वरी देवल कमेटीची नवीन योजना मंजूर होईपर्यंत 2016 च्या योजनेनुसार अंबाजोगाईचे तहसीलदार पदसिद्ध अध्यक्ष आहेत त्यानंतर राजकिशोर मोदी, माजी आमदार साठे, भगवानराव शिंदे , कमलाकर चौसाळकर ,डॉ संध्या जाधव ,अक्षय मुंदडा, गिरिधालाल भराडीया ,गौरी जोशी, श्रीराम देशपांडे, शरद लोमटे ,सारंग पुजारी ,पूजा कुलकर्णी, अशोक लोमटे, संजय भोसले ,उल्हास पांडे या ट्रस्टीकडे देवल कमेटीचा कारभार पाहतील असे म्हटले आहे विशेष म्हणजे जुने व नवीन असे संयुक्त ट्रस्टीची यामध्ये नावे आहेत मात्र कोणीही सत्य पाहायला तयार नाही जुन्या ट्रस्टीने कायदे तज्ञाचा सल्ला घेत आज योगेश्वरी देवल कमेटीचे पदसिद्ध अध्यक्ष असणारे तहसीलदार यांच्याकडे पदभार द्यावा अशी ट्रस्टी लेखी पत्र देऊन मागणी करणार असल्याचेही समजते