बांधकाम खात्याच्या जागेवर दावा करणाऱ्या महाविद्यालयाने शासनाच्या जागेवर अतिक्रमण केले नाही ना ?

सब टायटल: 
सेवा करणाऱ्या राजाची चूक नसताना पाटलांनी त्याचा चार महिन्याचा पगार रोखला कसा
Arogya Shikshan

.

          अंबाजोगाई (प्रतिनिधी)-  

अनेकांना सवय असते आपले ठेवायचे झाकून दुसऱ्याचे पाहायचे वाकून संरक्षक भिंतीच्या बाहेर मालकी हक्क सांगणाऱ्या महाविद्यालयाला ताब्यात असणारी शासनाची जमीन खरीच दिली आहे का ?अशी कुजबूज या परिसरात सुरू आहे बांधकाम खात्याच्या जागेवर मालकी हक्क सांगणाऱ्या महाविद्यालयाचे शासनाच्या जागेवर अतिक्रमण नाही ना असाही आता सवाल उपस्थित केला जात आहे  कोणतीही चूक नसताना एखाद्या कर्मचाऱ्याला चार चार महिने पगार न देणे हे कोणत्या नियमात बसते सर्वांची सेवा करणाऱ्या राजाचा पगार पाटलांनी रोखण्याचे आदेश दिल्याचे सांगितले जात आहे खरंच पाटलांनी राजाचा पगार रोखला का ? अशी चर्चा होत आहे

     अंबाजोगाईच्या महाविद्यालय प्रशासनाकडे माहिती अधिकारांतर्गत माहिती विचारली असता प्रशासनाने अर्जदाराकडून शुल्क भरून माहिती द्यावयास हवी किंवा माहिती उपलब्ध नसल्याचे लेखी पत्र द्यावयास हवे ते करण्याऐवजी तोंडी खुलासा करण्याचा प्रशासन प्रयत्न कशासाठी करत आहे अशीही चर्चा होत आहे अंबाजोगाईत अनेक शाळा महाविद्यालय यांना शासनाने शासकीय कोट्यातील जागा दिल्या आहेत अनेक महाविद्यालयाने शासनाने दिलेल्या जागेपेक्षा जास्त प्रमाणात जागा ताब्यात घेतल्याची कुजबूज शहरात होत आहे शासनाच्या जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांनी नागरिकांना कोणीही अतिक्रमण केल्यास कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असा त्यांना अधिकार आहे का ? अशीही आता चर्चा होऊ लागली आहे प्रशासनाने नेमकी शाळा महाविद्यालय यांना जागा किती दिली व महाविद्यालय, शाळांनी ती ताब्यात किती घेतली याची चौकशी केली पाहिजे अशी ही मागणी जनतेतून होत आहे