जयवंती नदीतील अतिक्रमण संदर्भात उच्च न्यायालयात दोन वर्षांपूर्वी दाखल जनहित याचिकेत अद्याप निकाल आला नाही

सब टायटल: 
अप्पर जिल्हाधिकारी यांनी दोन वर्षांपूर्वी घेतलेल्या बैठकीचा इतिवृत्तांत आला बाहेर कोण काय म्हणाले ते पहा
Maharashtra

.

           अंबाजोगाई (प्रतिनिधी)-  

      अंबाजोगाई जिल्हा निर्मिती व जयवंती नदीतील अतिक्रमण हे दोन विषय राजकीय नेत्यासाठी जेव्हा कोणाला एकमेकाची जिरवायची असते त्यावेळी हा विषय पुढे येतो अभिजीत लोमटे यांच्या उपोषणामुळे जयवंती नदीतील अतिक्रमणाचा विषय चर्चेत आला मात्र यामुळे अनेकांची धाबे दणानले असल्याचे समजते दोन वर्षांपूर्वी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल आहे मात्र आजपर्यंत त्या याचिकेचा निकाल लागला नाही किंवा कोणी न्यायालयाकडे जाऊन मागितलाही नाही मात्र अपर जिल्हाधिकारी यांनी याच संदर्भात घेतलेल्या बैठकीचा इतिवृत्तांत समोर आला आहे या बैठकीत कोणता अधिकारी काय म्हणाला ते पहा 

                     त्यावेळी कार्यरत अंबाजोगाई नगर परिषदेचे सिओ अशोक साबळे म्हणतात आंबेजोगाई शहरात जयवंती नामक वाहणारा प्रवाह नदी आहे की नाला ? प्रथम निश्चित होणे आवश्यक आहे अशी मागणी केल्यानंतर जलसंपदा जलसंधारण जलविज्ञान केंद्र पाटबंधारे आदी विभागांनी अभिप्राय सादर करण्याचे निर्देश देण्यात आले जनहित याचिकेत नगरपरिषदेच्या घनकचरा संदर्भात मुद्दा होता शहरातील घाण पाणी या नदीतून वाहते त्यासाठी एसटीपी साठी जागा निश्चितीची ही मागणी सीओ यांनी केली होती आज पावेतो एसटीपी साठी जागा निश्चित होऊ शकली नाही 

      भूमी अभिलेख कार्यालयाचे प्रतिनिधी क्षीरसागर यांनी सांगितले की सण 1959 ते 1964 च्या उपलब्ध हस्तलिखित तलाठी यांच्याकडील सातबारावर इतर हक्क रकान्यात नदी व इतर नोंदी असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते सर्वे नंबर 358 ,359, 360, 364, 761 चा सर्वे नंबर मधून दर्शवलेला प्रवाह बाबत या कार्यालयाकडील गाव नकाशा टोचा नंबर दोन मध्ये नदी नाला ओहोळ अशी नोंद असल्याचे सांगण्यात आले भूमी अभिलेख विभागाच्या अभिप्रायानंतर सर्व परिस्थिती स्पष्ट होते तरीही नगरपरिषद प्रशासन म्हणत असेल की जयवंती नदी की नाला ? तर मग झोपलेल्यांना जागे करता येईल मात्र झोपेचे सोंग घेणाऱ्यांना जागे करणे तेवढे सोपे नसते एवढे मात्र नक्की प्रदूषण नियंत्रण मंडळ जालना विभागाचे अधिकारी डॉ कल्याणी आनंदराव सांडपिठे म्हणतात कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग बीड यांचे म्हणणे आहे पावसाळा वगळता सदर नदी वर्षभर कोरडी असते पूर रेषा सीमांकनाचे काम झाले नाही नदीला गेल्या 25 वर्षात पुराबाबतची माहिती या कार्यालयाकडे उपलब्ध नाही तसेच वाळू उपसा दिसत नाही असे म्हटले आहे आश्चर्याची बाब आहे की प्रशासनाकडे जयवंती नदीला गेल्या पंचवीस वर्षात पूर आल्याची माहिती उपलब्ध नाही नदीच्या काठावर बंगला बांधून राहत असलेले ॲड जगतकर यांचे कुटुंब काही वर्षांपूर्वी पुरात अडकले होते हे त्यांचे मूर्तीमंत जिवंत उदाहरण असताना प्रशासन म्हणते माहिती उपलब्ध नाही, धन्यवाद 

        जलसंधारण उपविभागाचे उपअभियंता माने म्हणतात कार्यालयाकडे उपलब्ध माहितीवरून स्थानिक नाला अशी नोंद आहे या व्यतिरिक्त या कार्यालयाकडे माहिती उपलब्ध नाही पाटबंधारे खात्याचे उप अभियंता प्रवीण मुंडे म्हणतात या कार्यालयाने पूर रेषा आखणीचे काम करण्यात आले नाही या व्यतिरिक्त आमच्याकडे कोणतीही माहिती उपलब्ध नाही जलविज्ञान विभागाचे उपअभियंता एम व्ही काळे म्हणतात आमच्या कार्यालयाच्या मार्फत जयवंती नदीचे कोणतेही कामे केली जात नाहीत आता प्रश्न पडतो विविध संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची एवढी उदासीनता असेल तर जयवंती नदी की नाला ? हे कसे निश्चित होणार गेली शेकडो वर्षापासून शहरात वाहणारी जयवंती नदी की नाला पन्नास वर्षात नगरपरिषद प्रशासनाला निश्चित माहिती नसेल तर ठरवणार कोण ? असा प्रश्न पडतो