जवळगावचे गायरान प्रकरण थंड करणारा नेता, अभिनेता, अधिकारी नेमका आहे तरी कोण ?

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी)-
अंबाजोगाई तालुक्यातील मौजे जवळगाव येथील गायरानधारकांनी शंभर दिवसापेक्षा अधिक कार्यकाळ गायरानातच धरणे आंदोलने केली दरम्यान कंपनीने जबरदस्ती करून ताबा करण्याचा प्रयत्न केला मात्र शेवटचा पर्याय म्हणून चौघा गायरान धारकांनी विष प्राशन केले आंबेजोगाई तालुक्यातील सर्वच दलित संघटना तसेच इतर नेत्यांनी गायनधारकांसाठी संघर्ष केला आंदोलनाचा एवढा भडका उडाला असताना अचानक सर्व काही थंड झाल्याचे समजते ही बाब गायरान धारकाच्या दृष्टीने चांगली असली तरी आंदोलन थंड करणारा नेता, अभिनेता, प्रशासकीय अधिकारी नेमका आहे तरी कोण ? प्रकरणात न्याय मिळाला असेल तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाठपुरावा करणारा अशोक पालके यांनाच या निर्णयाचे श्रेय जाते एवढे मात्र नक्की अशीही चर्चा तालुक्यात होत आहे
जवळगाव येथील गायरानात सौर ऊर्जा प्रकल्प राबवणारी एजन्सीच्या पाठीशी केज आंबेजोगाई लातूर येथील काँग्रेसचे नेते मंडळी असली तरी ते कधीही समोर आले नाहीत त्यांच्या वतीने बर्दापूर पोलिसांनी गायरानात खिंड लढवल्याचा अनेक वेळा आरोप झाला बर्दापूर पोलिसांनी अनेकावर गुन्हे दाखल केले टोकाचे आंदोलने झाली मात्र कोणत्याच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी या प्रकरणाकडे कोणीही पाहिले नाही अपवाद कालच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या निदर्शने आंदोलनात करुणा मुंडे सहभागी झाल्या होत्या
दुसऱ्या दिवशी कंपनीने रोवलेले खांब उखडून फेकण्याचा निर्णय गायरानधारकाच्या वतीने आंदोलनकर्त्यांनी घेतला होता मात्र रात्री कुठून जादुची कांडी फिरली माहीत नाही जवळगावचे आंदोलन थंड झाले गायनधारकांना न्याय मिळाला का ? सौर ऊर्जा कंपनीने माघार घेतली का ? गायरान धारक दोन पावले मागे सरकले का ? प्रशासन पुढे आले का ? यापैकी एकाही प्रश्नाचे उत्तर कोणीच द्यायला तयार नाही त्यामुळे नेमके आंदोलन कोणी थंड केले हे मात्र अद्याप समजू शकले नाही