अंबाजोगाईला पुस्तकाचे गाव जाहीर करण्यासाठी प्रयत्न करणारे राजकीय नेते साहित्यिकांनो -

सब टायटल: 
जागतिक पुस्तक दिनानिमित्त किमान दोन तास तरी लायब्ररीमध्ये पुस्तक वाचनाचा कार्यक्रम घेणार का ?
Arogya Shikshan

.

अंबाजोगाई (प्रतिनिधी)-  

अंबाजोगाईला पुस्तकाचे गाव म्हणून शासनाने जाहीर केले त्यासाठी आपणच प्रचंड प्रयत्न केला असा दावा राजकीय नेत्याकडून केला जाऊ लागला कोणी मागील तारखेत दिलेले निवेदन तर कोणी प्रेस नोट ची बातमी आलेले कात्रण सोशल मीडियावर टाकत यासाठी आपण किती आटोकाट प्रयत्न केला ते दाखवण्याचा प्रयत्न झाला आज जागतिक पुस्तक दिन आहे याची कल्पना किमान शहरातील खाजगी शिक्षण संस्थेचे महाविद्यालय तसेच साहित्य निकेतन नगरपरिषदेच्या लायब्ररेरियनला सुद्धा कल्पना आहे की नाही माहित नाही या दिवशी किमान ज्या नेत्यांनी साहित्यिकांनी प्रयत्न केला त्यांच्या संस्थेमधील लायब्ररेरीत किमान दोन तास पुस्तक वाचनाचा कार्यक्रम घ्यावयास हवा होता अशी मागणी जनतेतून होत आहे 

शासनाने अंबाजोगाईला पुस्तकाचे गाव म्हणून जाहीर केले मात्र त्यासाठी समन्वयक म्हणून अंबाजोगाईच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्याची नियुक्ती केली या पदावर सध्या कोणीच अधिकारी कार्यरत नसल्याने प्रभारी आहेत त्यांना महसूल खात्यातील कामाने वेळ मिळत नाही ते कधी अशा सामाजिक कार्यात भाग घेतील 

राजकीय नेते कोणताही कार्यक्रम घेताना यात आपला राजकीय फायदा काय ?  हा विचार करतात त्यामुळे समाजात वाचन संस्कृती वाढावी यासाठी ते प्रयत्न करतील त्यांच्याकडून अपेक्षा करणे गैर आहे मात्र शहरात अनेक महाविद्यालय आहेत त्यांच्या लायब्ररी आहेत विद्यार्थी नसले तरी प्राध्यापक कर्मचाऱ्यांना तरी दोन तास पुस्तकाचे वाचन करून जागतिक पुस्तक दिन साजरा केला तर किमान जबाबदारी आपण पार पाडली एवढे तरी मनाला समाधान मानता येईल घेईल का कोणी पुढाकार ?