कॅन्सर ग्रस्त ऊसतोड मजूर बळीराम उपाडे यांना ॲड. माधव जाधव यांनी दिला मदतीचा आधार .

Arogya Shikshan

अंबाजोगाई (प्रतिनिधी )- 

परळी विधानसभा मतदारसंघातील पट्टीवडगाव तालुका अंबाजोगाई येथील मागासवर्गीय समाजातील ऊसतोड मजूर बळीराम रावसाहेब उपाडे यांना कॅन्सर हा आजार झालेला आहे.गेल्या काही महिन्यापासून कॅन्सर आजाराने ते त्रस्त आहेत.घरची परिस्थिती अतिशय हलकीची व बिकट असून ऊसतोड मजुरी करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय त्यांच्या पुढे नव्हता.परंतु कॅन्सर झाल्यामुळे ऊस तोडणी ला सुद्धा जाणे त्यांना अशक्य झाले व मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविणे सुद्धा त्यांना अशक्य झाले. बळीराम उपाडे यांना लहान दोन मुले व लहान दोन मुली आहेत तसेच पत्नी व आई असून वडिलांचे निधन झालेले आहे.कुटुंबात दुसरा कोणीही कर्ता पुरुष नाही.त्यामुळे कॅन्सर सोबत लढत असताना कुटुंबातील सदस्यांच्या पोटापाण्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागत आहे. बळीराम उपाडे यांच्यावर मुंबई येथे टाटा हॉस्पिटलमध्ये कॅन्सरवर उपचार करण्याचे ठरले आहे परंतु मुंबई येथे जाणे येण्यासाठी चा खर्च करणे सुद्धा त्यांना अशक्य आहे.ही बाब किसान काँग्रेसचे मराठवाडा अध्यक्ष तथा काँग्रेस पार्लमेंटरी बोर्ड सदस्य ॲड.माधव जाधव यांना समजल्यानंतर पट्टीवडगाव  येथे जाऊन बळीराम उपाडे यांना दहा हजार रुपये नगदी रोख मदत केली.यावेळी जय भारती प्रतिष्ठानचे सदस्य जी.डी. थोरात साहेब व तसेच इंजिनीयर परमेश्वरजी भिसे साहेब हे उपस्थित होते.तसेच गावातील गोविंदरावजी तारसे,नारायणराव लव्हारे ,बन्सी पाटील,लक्ष्मण कांबळे,मधुकर कांबळे व बालासाहेब कांबळे हे उपस्थित होते.