बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अधिक प्रभावशाली होण्याची शक्यता वाढली

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी )-
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार झाल्यानंतर जिल्ह्यात अजित पवार गटाला अच्छे दिन येतील असा कयास राजकीय जाणकारांनी लावला होता तो आता खराच ठरला असेच म्हणावे लागेल आज केज मतदार संघातील नेते रमेश आडसकर सह नगराध्यक्ष व हरून भाई यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्याने जिल्ह्यात इतर पक्षापेक्षा अजित दादा पवार गटाची राजकीय ताकद वाढली असेच म्हणावे लागेल दादांनी जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात पक्षाची सदस्य संख्या वाढवण्याचा सल्ला देताना निधी पाहिजे तेवढा दिला जाईल मात्र त्याचा योग्य वापर झाला पाहिजे अन्यथा कोणत्याही पक्षाचा आमदार नेता असला तरी गय करणार नाही असेही नम्रपणे सांगितले
रमेश आडसकरांनी यापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यांना विधानसभेची माजलगाव ची उमेदवारी हवी होती मात्र ती मिळाली नाही त्यांनी विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला त्या ठिकाणी त्यांचे परंपरागत मित्र जिल्ह्याचे विद्यमान खासदार बजरंग सोनवणे होते तरीही त्यांनी त्या गटात प्रवेश केला मात्र त्यांना माजलगावची विधानसभेची उमेदवारी मिळू शकले नाही निवडणूक लढवली पराभूत झाले त्यांनी सध्या अंबा कारखान्याकडे लक्ष केंद्रित केले असल्याचे समजते केंद्राचा निधी मंजूर होऊन मिळत नव्हता आता पुन्हा एकदा अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी अजित पवार गटात त्यांनी प्रवेश केला मात्र यावेळी त्यांच्यासोबत हारून इनामदार आहेत दादा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आडसकर इनामदार एकत्र आल्याने केजच नव्हे अंबाजोगाई सह जिल्ह्यात अजित पवार गट सध्या तरी इतर राजकीय पक्षापेक्षा पावरफुल होताना दिसत आहे आता बीड जिल्ह्यातील नेत्याची मोट पालकमंत्री अजित दादा पवार कशी बांधतात तो येणारा काळच ठरवेल
अंबाजोगाईच्या रुग्णालयाला लागेल ती मदत दिली जाईल
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांनी आजच्या पक्षप्रवेशावेळी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालय संदर्भात विशेष उल्लेख करून या रुग्णालयासाठी ज्या ज्या सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी निधीची आवश्यकता आहे तुम्ही सर्वांनी त्याकडे लक्ष द्या प्रस्ताव पाठवा या खात्याचे मंत्री हसन मुश्रीफ आहेत मी अर्थमंत्री आहे पालकमंत्री आहे गोरगरीब रुग्णाच्या उपचारासाठी जे जे शक्य असेल ते सर्वांनी प्रयत्न करून उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावा अशाही सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित दादा पवार यांनी केल्याने अंबाजोगाईसाठी हा दिलासा म्हणावा लागेल