अंबाजोगाईतील राजकीय पुढार्‍यांना प्रत्येक कामाचे श्रेय नक्की घ्यायचे पत्रकार परिषद घेऊन नाही तर प्रेस नोट मार्फत

सब टायटल: 
पालकमंत्री अजितदादा पवार यांनी एवढा मोठा क्रांतिकारक निर्णय घेतला त्याचे साधे स्वागत करण्याऐवजी पुस्तकाच्या गावाची चर्चा होत आहे
Rajkiya

.

                अंबाजोगाई (प्रतिनिधी )- 

        पूर्वी लोकप्रतिनिधी विविध राजकीय पक्षाचे नेते एखादी योजना विकास कामे आणली तर पत्रकार परिषद घेऊन हे आमच्या प्रयत्नामुळे झाल्याचा दावा पत्रकार परिषदेतून केला जायचा मात्र अलीकडे राजकीय पुढाऱ्यांना पत्रकारांची ऍलर्जी झाली की काय कोणास ठाऊक पुढार्‍यांनी नवीन शक्कल लढविली एका पत्रकाराच्या मार्फत प्रेस नोट मधून सध्या दावा केला जातो पत्रकार परिषद कोणीही राजकीय पुढारी घेत नाही प्रेस नोटच्या बातम्या छापल्या तरच पत्रकारांना जाहिरात नाहीतर नावावर आवळा असा सध्या प्रयोग सुरू आहे राजकीय नेत्यांना कामाचे तर श्रेय घ्यायचे पत्रकार परिषद घेऊन नाही तर प्रेस नोट मार्फत एकच बातमी अनेक वर्तमानपत्रात जशीच्या तशी छापून यावी ही अपेक्षा असते जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांनी बीड जिल्ह्यासाठी एवढा मोठा क्रांतिकारक निर्णय घेतला मात्र त्या निर्णयाच्या स्वागताऐवजी अंबाजोगाईला पुस्तकाचे गाव जाहीर केल्याचीच गावभर चर्चा होत आहे 

          राज्याचे भाषा मंत्री उदय सामंत यांनी अंबाजोगाई शहराला पुस्तकाचे गाव म्हणून जाहीर केले कोणीतरी मागणी केली म्हणून नव्हे तर दोन वर्षांपूर्वी अंबाजोगाई शहरात भिलार गावच्या साहित्यिकासह शासकीय अधिकाऱ्यांची एक समिती आली होती त्या समितीने आपला पाहणी अहवाल शासनास सादर केला त्यानंतर सरकारने आजचा निर्णय घेतला यासाठी श्रेयाची चढाओढ  सोशल मीडियावर सध्या जोरात सुरू आहे मात्र या संदर्भात एकाही राजकीय पुढाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन कोणताही दावा करण्याची हिम्मत का दाखवली नाही अशीही चर्चा होत आहे 

        बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांनी सी आय आय टी स्थापन करण्याची घोषणा केली तब्बल 191 कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प उभा राहणार आहे दरवर्षी 7000 युवकांना या मार्फत प्रशिक्षित केले जाणार आहे याची खरी गरज बीड जिल्ह्याला होती मागील काही दिवसांपूर्वी अजितदादा बीड जिल्ह्यात आले तेव्हा त्यांनी जिल्ह्याला आश्वासन दिले होते त्याप्रमाणे त्यांनी टाटा कंपनीला विनंती केल्यानंतर टाटा कंपनीने दादांची विनंती मान्य करत हा प्रकल्प सुरू करण्याचा मनोदय व्यक्त केला दादांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे पूर्तता केली त्यांचे आभार जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी राजकीय पक्ष नेत्यांनी मानले पाहिजे होते मात्र तसे काही होताना दिसत नाही माजी पालकमंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी अजितदादा यांचे आभार मानले आहेत