भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका केंद्राचे पालकमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते होणार उद्घाटन

सब टायटल: 
वंचित बहुजन आघाडीच्या इशाऱ्यानंतर नगरपरिषद प्रशासनाने शहराध्यक्ष गोविंद मस्के यांना दिली माहिती
Sampadkiya

.

                   अंबाजोगाई (प्रतिनिधी)-  

अंबाजोगाई नगर परिषदेने करोडो रुपये खर्च करून बांधलेली डॉ बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका केंद्राच्या इमारतीला गेली अनेक दिवसापासून कुलूप असल्याने बंद आहे जयंती दिनी या केंद्राचे उद्घाटन करावे अन्यथा वंचित आघाडीच्या वतीने आज रीतसर जयंती दिनी उद्घाटन करण्यात येईल असा इशारा देताच नगरपरिषदेच्या सिओ पासून सर्वजण खडबडून जागे झाले एवढ्या दिवसात झाले नाही ते फक्त एका दिवसात निर्णय झाला नगरपरिषदेच्या सिओ व स्वच्छता निरीक्षक यांनी वंचितचे शहराध्यक्ष गोविंद मस्के यांना शब्द दिला म्हणे येत्या 22 एप्रिल किंवा एक मेपर्यंत जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते या अभ्यासिका केंद्राचे उद्घाटन होईल थोडा धीर धरा !

             नगरपरिषद प्रशासनाने सदरील अभ्यासिका केंद्राच्या इमारतीचे बांधकाम केले असून आतील फर्निचरचे सुद्धा काम झाल्याचे समजते एवढेच नाही तर या अभ्यासिका केंद्राला आगीपासून सुरक्षा देणारी यंत्रणा सुद्धा कार्यान्वित आहे मग या अभ्यासिका केंद्राचे उद्घाटन करून कार्यान्वित का केले जात नाही असा सवाल आम्ही मराठवाडा दर्पणच्या माध्यमातून उठवला होता त्यावर वंचित आघाडीचे शहराध्यक्ष गोविंद मस्के यांनी नगरपरिषद प्रशासनाला 14 एप्रिल पर्यंत या अभ्यासिका केंद्राचे उद्घाटन नगरपरिषद प्रशासनाने केले नाही तर वंचितच्या वतीने कोणत्याही क्षणी आम्ही या अभ्यासिका केंद्राचे उद्घाटन करू असा मनोदय व्यक्त केला होता ही बातमी मराठवाडा दर्पणच्या माध्यमातून प्रसारित होताच नगरपरिषद प्रशासन खडबडून जागे झाले व नगरपरिषदेच्या सीओ टोंगे मॅडम व स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे यांनी शहराध्यक्ष मस्केना विनंती केली मस्केंनी नगरपरिषद प्रशासनाच्या विनंतीला मान दिला त्यामुळे प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडला असल्याचे समजते आता पालकमंत्र्याच्या हस्ते या अभ्यासिका केंद्राच्या इमारतीचे उद्घाटन होईल असे समजायला हरकत नाही