दीनानाथ रुग्णालयातील प्रकरण मीडियाने उचलून धरले त्यामुळे राज्यभर चर्चा झाली शासनाने दखल घेतली

सब टायटल: 
अंबाजोगाई शहरात सुद्धा अशी प्रकरणे अनेक वेळा चर्चेत आली मात्र कोणीही आवाज उठवला नाही प्रकरणे दबली
Arogya Shikshan

.

                अंबाजोगाई (प्रतिनिधी)-  

                 मुंबईच्या दीनानाथ रुग्णालयातील प्रकरण आमदारांच्या पीए शी संबंधित होते मीडियाने या प्रकरणाला वाच्यता फोडली त्यानंतर शासनाने दखल घेतली चौकशी झाली डॉक्टरांनी राजीनामा दिला हा प्रकार फक्त मुंबईतच होतो राज्यात इतर शहरातील खाजगी रुग्णालयात असे प्रकार अजिबात होत नाही असे ठामपणे कोणीही सांगू शकणार नाही अंबाजोगाई शहरासह लातूर, नांदेड ,संभाजीनगर प्रत्येक खाजगी रुग्णालयात हीच अवस्था असल्याची चर्चा होत असून इतर ठिकाणी यापेक्षा गंभीर घटना घडूनही त्याची दखल मीडियाने न घेतल्याने प्रकरण स्थानिक पातळीवर दबली जातात अशी आता चर्चा होत आहे 

      दुसरा सर्वात महत्त्वाचा प्रश्न सध्या जनतेत चर्चेला जात आहे तो म्हणजे खाजगी व्यवसाय करणारी कोणतीही कंपनी असो ट्रस्ट त्यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या सोयी सुविधाचा दर पत्रक दर्शनी भागावर लावलेले असतात असे दर पत्रक एकाही खाजगी रुग्णालयाने आपल्या रुग्णालयाच्या दर्शनी भागात कोणत्याही सुविधांचे अथवा शस्त्रक्रियाचे काय दर असतील या संदर्भात कुठेही फलक दिसत नाही एवढेच काय तर रुग्ण पहिल्यांदा तपासणीला आला तर चिट्ठी साठी दोनशे रुपये द्यावे लागतात सर्वच खाजगी रुग्णालयात रुग्णावर उपचार सुरू करण्याआधी डिपॉझिट जमा करण्याच्या सूचना केल्या जातात नव्हे डिपॉझिट केल्याशिवाय उपचार सुरू केले जात नाहीत अशीही आता चर्चा सुरू होत आहे शासन आता तरी खाजगी रुग्णालयासाठी आचारसंहिता लागू करणार आहे का ? जसे खाजगी कोचिंग क्लासेस वाल्यांनी फीस किती घ्यावी हा त्यांचा अधिकार आहे तसेच रुग्णाकडून खाजगी रुग्णालयाने किती शुल्क आकारावे हे त्या रुग्णालयांना अधिकार असल्याने गोरगरीब रुग्णाची आर्थिक पिळवणूक होते मात्र या संदर्भात कोणीही उघड बोलायला तयार नसते मात्र दीनानाथ सारखे एखाद्या व्हीआयपी सोबत घटना घडली की त्याची मात्र चर्चा होते तीही मोठ्या पुणे, मुंबईसारख्या शहरात घडणाऱ्या घटनेची तीच घटना अंबाजोगाई ,लातूर, संभाजीनगर, नांदेड सारख्या शहरात घडली असती तर चर्चा सोडा त्या नातेवाईकांना रुग्णालयाचे पैसे भरून आपली सुटका करून लागली असती या संदर्भात कुठेही चर्चा होत नाही मीडियाने या प्रकरणाची चर्चा पटलावर आणल्याने राज्यभर घटनेची चर्चा झाली त्यामुळे राज्यातील खाजगी रुग्णालय सावध झाली असतील एवढे मात्र निश्चित