अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयातील रुग्ण व नातेवाईकांना पिण्याचे पाणी नसल्याने स्वच्छता गृहासाठी ठेवलेले पाणी पिण्याची पाळी ?

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी)-
स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात एक ना अनेक समस्या आहेत प्रत्येक समस्येला फक्त डीनच जबाबदार नसतो मग वार्डाचे इन्चार्ज , विभागप्रमुख इतरांची काही जबाबदारी नाही का ? शासकीय रुग्णालयातील वार्डात पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट आहे सर्वात गंभीर बाब म्हणजे वार्डाच्या स्वच्छतागृहात पाण्याची टाकी ठेवली आहे त्यावर पिण्याचे पाणी असा उल्लेख असल्याने अनेक नातेवाईकांना वाटले हे पिण्याचे पाणी समजून ते पाणी पीत असल्याचे स्वतः डोळ्यांनी संभाजी ब्रिगेडच्या महिला अध्यक्ष सुनंदा लोखंडे यांनी पाहिले उद्या या संदर्भात त्या डीन यांना निवेदन देणार आहेत कुठे गेले समाजसेवक, समाजसेवी संघटना, दानशूर व्यक्ती कोणालाच याचेशी देणे घेणे नाही का ? असा संतप्त सवाल जनतेतून केला जात आहे
सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला पाण्याची नितांत गरज असते प्रत्येक वार्डात रुग्ण व त्यांचे नातेवाईकांना पिण्याचे पाणी नसल्याने त्यांना पाणी विकत घ्यावे लागत आहे खाजगी पाणी विक्रेत्याच्या आर्थिक लाभासाठी गोरगरीब रुग्ण व नातेवाईकांची ठरवून आर्थिक पिळवणूक होत असताना वार्डात पिण्याचे पाणी नाही यासंदर्भात उपाययोजना करण्याची वार्ड इनचार्ज पासून विभाग प्रमुख तसेच वैद्यकीय अधीक्षक उपअधीक्षक यांची काहीच जबाबदारी नाही का ? रुग्णालय परिसरात अनेक ठिकाणी जलकुंभ शोभेच्या वस्तू म्हणून उभे आहेत काही ठिकाणी थोडावेळ पाणी येते इतर वेळेला तहान भागवण्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांना मेडिकल कॅन्टीनमध्ये तसेच ऑटो पॉईंट वर जाऊन पैसे मोजून बाटलीभर पाणी आणावे लागते पुन्हा तीच पायपीट ज्या रुग्णाकडे नातेवाईक नाही त्यांनी काय करायचे
संभाजी ब्रिगेडच्या महिला अध्यक्षांचा गंभीर आरोप
अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयातील एवढ्या गंभीर समस्या असताना कार्यरत असणाऱ्या एकाही विभाग प्रमुखाला याचेही देणे-घेणे नाही असेच म्हणावे लागेल त्याचे कारण म्हणजे प्रत्येक विभाग प्रमुखाच्या पाठीशी कुठल्या ना कुठल्या राजकीय नेत्याचा आशीर्वाद असतो त्यामुळे डीन यांना सुद्धा विभाग प्रमुखाला सूचना करताना सांभाळून बोलण्याची पाळी आल्याचे बोलले जात आहे हा प्रश्न गंभीर वाटत नसला तर विभाग प्रमुखाचे समर्थन करणारा एकही नेता पुढे येऊन रुग्णालयातील वॉर्डातील रुग्ण व नातेवाईकांना पिण्याचे पाणीपुरवठा मी करतो असे कोणीही म्हणत नाही आहो तेही जाऊ द्या इतर वेळा समाजसेवेच्या बेंबीच्या देठापासून डंका पिटणारी देशात नाव असलेली समाजसेवी संघटना त्यांनीही कधी गोरगरिबा साठी पुढाकार घेतल्याचे ऐकिवात नाही समाजसेवक, समाजसेवी संघटना तर समाजात शिल्लक आहेत का ? असे म्हणण्याची पाळी सध्या आली आहे
संभाजी ब्रिगेडच्या अंबाजोगाईच्या महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष सुनंदा लोखंडे यांनी अत्यंत गंभीर आरोप केला आहे त्या म्हणतात नातेवाईक एडमिट असल्याने मी वार्डात गेले असता स्वच्छता गृहाच्या बाजूला पाण्याची टाकी ठेवलेली आहे त्यावर चक्क पिण्याचे पाणी असे लिहिले असल्याने वार्डातील काही रुग्णाच्या नातेवाईकांनी त्या टाकीतील पाणी पित असल्याचे आपण स्वतः पाहिले ही बाब अत्यंत गंभीर आहे आपण संघटनेच्या वतीने उद्या रुग्णालयाचे डीन यांना निवेदन देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे पिण्याचे पाण्याची समस्या सोडवण्यासाठी इतर राजकीय पक्ष, नेते, आजी-माजी आमदार संघटना पुढाकार घेणार का की आपल्याला काय करायचे म्हणून गप्प बसणार बघू कोण कोण येते पुढे