एक्स-रे ची सुविधा मिळाल्याने एका चिमुकलीवर होणारी संभाव्य मोठी शस्त्रक्रिया टळली

सब टायटल: 
अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयातील एक्स-रे व सिटी स्कॅन सुविधा सुरू झाली
Arogya Shikshan

.

                   अंबाजोगाई (प्रतिनिधी)-  

     स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयातील एक्स-रे मशीन तसेच सिटीस्कॅन मशीन काही दिवसांपासून बंद होती दोन्हीही सुविधा आता पुन्हा सुरू झाल्या आहेत मात्र याच रुग्णालयातील एका चिमुकलीच्या पोटातील आजार नेमका काय आहे याचे निदान होत नव्हते एक्स-रे मशीन छोटी होती त्यामुळे डॉक्टरांना काय निर्णय घ्यावा अशा संदर्भात असताना त्या चिमुकुलीचे नशीब म्हणा किंवा योगायोग एक्स-रे-मध्ये त्या चिमुकलीच्या पोटातील आजाराचे मूळ सापडले अवघ्या तासाभराच्या शस्त्रक्रिया नंतर आज ती चिमुकली ठणठणीत असल्याचे समजते साधा एक्स-रे एखाद्या रुग्णाला जीवदान देऊ शकतो हेच या घटनेवरून अधोरेखित होते 

        अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयाच्या वार्ड क्रमांक पाच मध्ये ही चिमुकली सध्या उपचार घेत आहे आठ दिवसापासून या चिमुकलीचे पोट फुगले होते डॉक्टरांनी अनेक तपासण्या केल्या मात्र निदान सापडत नव्हते अनेक वेळा एक्स-रे काढून घेतला मात्र तो छोटा होता या विभागातील डॉक्टरांनी चिमुकलीच्या आई-वडिलांची घालमेल पाहून पोटाची मोठी शस्त्रक्रिया करून पोटातील आतड्यांना इन्फेक्शन झाले नाही ना ? यासाठी मोठी शस्त्रक्रिया करावी लागणार होती विशेष म्हणजे ती मुलगी असल्याने भविष्यात अनेक समस्या उद्भवू शकतात त्यामुळे पोटाची मोठी शस्त्रीय करावी की नको ? अशी डॉक्टरांची घालमेल सुरू होती अनेक वेळा म्हटले जाते शासकीय रुग्णालयातील डॉक्टर गोरगरीब रुग्णांना पाहत नाहीत शिफारस असल्याशिवाय उपचार करत नाहीत तपासात नाही मात्र या चिमुकलीचे आई-वडील मजुरी करणारे आहेत त्यांची कोणाची ओळख  नाही डॉक्टर यांना  या मुलीसाठी कोणाचाही फोन आला नाही 

           तरीही अंबाजोगाईच्या सर्जरी विभागातील सर्व डॉक्टर ती आपलीच मुलगी आहे मोठी शस्त्रक्रिया झाली तर त्याचे भविष्य अंधकारात लोटले जाईल म्हणून विचार करत होते आठ दिवस गेले ईश्वराला दया आली की काय कोण जाणे एक शेवटचा पर्याय म्हणून त्या चिमुकलीचा एक्स-रे काढला त्याच एक्स-रे मध्ये निदान सापडले अवघ्या एक तासात शस्त्रक्रिया करून ती गाठ काढण्यात आली 
सध्या त्या मुलीची तब्येत ठणठणीत आहे आई वडील म्हणतात लोक म्हणत होते डॉक्टर हा देव असतो आज आम्ही तो अनुभव घेतला अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी माझ्या मुलीला जीवदान दिले डॉक्टर देवच आहेत असे भावनिक होऊन आई वडील सांगत होते 

       का सांगितली घटना ?

अंबाजोगाईच्या रुग्णालयातील एक्स-रे, सिटीस्कॅन मशीन, सोनोग्राफी या सुविधा बंद झाल्या होत्या छोट्या साईजच्या एक्स-रे वर सध्या भागवले जात होते आज एक्स रे व सिटी स्कॅन ची सुविधा पूर्ववत सुरू झाली शासनाकडून प्राप्त होणारा निधी असो अथवा इतर योजना त्याची अंमलबजावनी होताना स्थानिक आमदाराचा प्रयत्न असतो त्यामुळे वाईटाचे खापर लोकप्रतिनिधीच्या कोणीही माथी मात्र त्याच बरोबर झालेल्या चांगल्या कामाचे सुद्धा श्रेय स्थानिक लोकप्रतिनिधींना दिले पाहिजे आमदार नमिता ताई मुंदडा रुग्णालयातील  सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करतात त्यांना श्रेय जाते हे कोणी नाकारू शकत नाही साध्या एक्स-रे नसल्यामुळे एका चिमुकलीचे आयुष्य अंधकारमय झाले असते त्याच एक्स रे ने त्याला जीवदान मिळाले सोनोग्राफी, सिटीस्कॅन तर त्यापेक्षा महत्त्वाचे आहे लोकप्रतिनिधी व प्रशासन हातात हात घालून काम करत असतील चांगल्या कामांना प्रत्येकाने प्रोत्साहन देऊन नवीन कामाच्या सूचनाही करणे गरजेचे आहे