छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मेडिकल कडे जाणारा मुख्य रस्ता नेमका किती मीटरचा रुंदीचा

सब टायटल: 
रस्ता रुंदीकरणासाठी बांधकाम विभागाने सक्तीच्या भूसंपादनाची प्रक्रिया अवलंब का गेली नाही याचीकाकर्त्याचा याचिकेत आरोप
Crime

.

अंबाजोगाई (प्रतिनिधी )- 

छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मेडिकल कडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूचे अतिक्रमण हटाव मोहीम सार्वजनिक बांधकाम खाते ,नगर परिषदेचे प्रशासनाने हटविले मात्र या संदर्भात शेख शफीक शेख सुलेमान ,शेख शकील सुलेमान ,शेख फजलु शमशुद्दीन, शेख यासीया आसिफ ,काझी अब्दुल वाजिद ,काझी सलीम जावेद , खमरुनिसा सुलतान, खाटीक सोहेल मसूद ,तोफिक अकबर शेख ,तात्याराव बाबुराव माने आदींनी मुंबई खंडपीठाच्या औरंगाबाद येथील उच्च न्यायालयात याविरुद्ध याचिका दाखल केल्यानंतर उच्च न्यायालयाने बांधकाम खात्यासह नगरपरिषद प्रशासनाला या संदर्भात नोटीस दिली असून याचिकाकर्त्याच्या हद्दीत पुढील तारखेपर्यंत कोणीतीही प्रक्रिया राबवू नये असे उच्च न्यायालयाने आदेशात म्हटले आहे

हा जुना रस्ता जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असताना रस्त्याच्या मध्यापासून चाळीस फूट होता त्यामुळे दोन्ही बाजूने बांधकामे झाली हा रस्ता जिल्हा परिषदे कडून बांधकाम खात्याकडे कधी वर्ग झाला कोणालाच कळले नाही आंबेजोगाई शहरातील रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू झाल्यानंतर अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली त्याचाच एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मेडिकल रोडवरील अतिक्रमण हटवण्यात आले अनेकांची घरी तुटली दोन चार मजली इमारतीचा समोरचा भागही तोडण्यात आला 

बांधकाम विभाग व नगरपरिषदेच्या कृतीविरुद्ध शेख शफीक व इतर जणांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने पुढील तारखेपर्यंत कोणतीही प्रति न करण्याचे आदेश दिलेत बांधकाम खाते नगरपरिषद प्रशासन नोटीस च्या उत्तरात काय म्हणणे सादर करते व न्यायालय पुढील तारखेला काय आदेश देते याकडे शहरातील व या भागातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे