अंबाजोगाई पंचायत समितीने शासकीय लोखंडी फलक डिजिटल बॅनर लावण्यासाठी भाडेतत्त्वाने दिले काय

सब टायटल: 
कोणाची विहीर मंजूर करायची कोणाचा घरकुलाचा हप्ता द्यायचा कोणते मस्टर काढायचे ठरवणाऱ्या प्रशासनाला हे दिसत नाही का
Crime

.

अंबाजोगाई (प्रतिनिधी)-  

आपण नियमाचे फार पक्के आहोत असा आव आणणाऱ्या अंबाजोगाई पंचायत समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यापासून कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या नाकावर टिचून पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरात दर्शनी भागात असलेला लोखंडी फलक फक्त शासकीय योजनेचे डिजिटल लावण्यासाठी असताना गेली अनेक महिन्यापासून स्थानिक नेत्याच्या वाढदिवसा सह विविध प्रसंगी डिजिटल बॅनर लावले जात आहेत अंबाजोगाई पंचायत समिती प्रशासनाने सदरीलचे शासकीय फलक भाडेतत्त्वावर डिजिटल लावण्यासाठी दिले काय ? असा जनतेतून सवाल केला जात आहे 

              अंबाजोगाई पंचायत समितीचे मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला भव्य असे लोखंडी फलक आहे नियमाने त्यावर फक्त शासकीय योजनेची माहिती असणारे जनतेच्या माहितीस्तव फलक लावणे अपेक्षित असते असे असताना गेली सहा महिन्यापासून पंचायत समितीच्या लोखंडी फलकावर खाजगी नेत्यांची कार्यकर्त्यांच्या वाढदिवसाची शुभेच्छांचे बॅनर लागत आहेत एकतर पंचायत समितीने हा फलक भाडेतत्त्वावर  दिला असेल अन्यथा  बेकायदेशीर डिजिटल लावणाऱ्या विरुद्ध पंचायत समिती प्रशासनाने अद्याप पर्यंत कार्यवाही केली असती एवढ्या दर्शनी भागावर अतिक्रमण होताना पंचायत समिती प्रशासन हेतूपरस्परपणे डोळेझाक का करत आहे असाही सवाल केला जात आहे