आमदार नमिताताई मुंदडा यांचे प्रयत्न सीओ टोंगे मॅडम यांची साथ मिळाल्याने नगर परिषदेतील सफाई कामगारांना मिळाला न्याय

सब टायटल: 
अंबाजोगाई नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागात काम करणाऱ्या कामगारांना मिळणार किमान वेतन व इतर सुविधा
Arogya Shikshan

.

               अंबाजोगाई (प्रतिनिधी)-  

       अंबाजोगाई नगर परिषदेने शहरातील स्वच्छतेचे कंत्राटदाराला कंत्राट दिली आहे मात्र त्या कंत्राटदाराने कामगारांना सतत तुटपुंजी पगार देऊन प्रचंड मेहनतीचे काम करून आजपर्यंत घेतले जात होते 25 वर्षे सत्ता उपभोगणाऱ्या स्वार्थी नेत्यांना सफाई कामगारांना लेकरबाळ असतात संसार असतो तेही माणसंच असतात त्यांचेही पोट पगारीवर भरते गरिबीची मजबुरी असते म्हणून ते प्रचंड घाणीचे कामे करतात त्यांना नियमाप्रमाणे कंत्राटदाराने पगार द्यावा ही भूमिका यापूर्वीच्या सत्ताधारी मंडळींनी कधीच घेतली नाही कारण त्यांना कंत्राटदाराचे हित जोपायसाचे होते अशीच आता चर्चा होत आहे मात्र केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिताताई मुंदडा यांनी नगर परिषदेच्या सिओ यांना पाच महिन्यापूर्वी लेखी पत्र दिले आमदार व सीओ दोन्हीही पदावर महिला कार्यरत असून सफाई कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी धाडसी निर्णय घेतला त्याची अंमलबजावणी सुद्धा सुरू झाली यामुळे सफाई कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे 

       काय आहे तो निर्णय ?

            सफाई  विभागात काम करणाऱ्या कामगारांना पगार किमान वेतनाप्रमाणे पगार व इतर सुविधा दिल्या जाव्यात हा शासन निर्णय यापूर्वीच काढलेला आहे मात्र कंत्राटदार त्याची अंमलबजावणी करत नसतात त्यांनी अंमलबजावणी करावी यासाठी करार करणारे नगराध्यक्ष व सीओ यांनी त्यांना निर्णय घ्यावा यासाठी बाध्य केले पाहिजे होते मात्र केले गेले नव्हते यामुळे सफाई विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगार कमी भेटत असे घाणीत काम करणारे कामगार काय आंदोलन करणार ? अंबाजोगाई नगर परिषदेच्या स्वच्छता विभागात काम करणारी कामगाराची प्रहार संघटना आहे अशोक गंडले यांच्या नेतृत्वाखाली वली पठाण व अतुल उघडे हे या कामगार संघटनेचे काम करतात या दोन कामगारांनी ही बाब आमदार नमिताताई मुंदडा यांच्या गटात सक्रिय भूमिका बजावणारे संजय गंभीरे यांच्या कानावर घातली गंभीरे यांनी ही बाब नंदू सेठ,आमदार महोदय यांच्या कानावर घातली त्यानंतर आमदार नमिताताई मुंदडा यांनी तातडीने नगर परिषदेच्या सिओ यांना दिनांक पाच ऑक्टोबर 2024 रोजी लेखी पत्र देऊन आंबेजोगाई नगर परिषदेतील सफाई विभागात काम करणाऱ्या कामगारांना तात्काळ किमान वेतनाप्रमाणे वेतन व इतर सुविधा देण्यात याव्या असे लेखी पत्र देऊन निर्देश दिले 

जानेवारीपासून मिळणार लाभ 

     अंबाजोगाई नगर परिषदेच्या स्वच्छता विभागात काम करणाऱ्या कामगारांना केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिताताई मुंदडा यांच्या प्रयत्नामुळे किमान वेतनाप्रमाणे पगार मिळण्यास सुरुवात झाल्याने सफाई विभागातील कर्मचाऱ्यांनी आमदार नमिताताई मुंदडा, ज्येष्ठ सामाजिक नेते नंदकिशोर मुंदडा, नगरपरिषदेच्या सीओ टोंगे मॅडम स्वच्छता विभागाचे प्रमुख स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे, संजय गंभीरे ,प्रहार संघटनेचे नेते अशोकराव गंडले आदि सर्व मान्यवरांचे आभार मानले आहेत किमान वेतनाप्रमाणे जानेवारीपासूनचा पगार सफाई कामगारांच्या खात्यावर पडायला सुरू झाला किमान वेतनाप्रमाणे वेतन देणारी आंबेजोगाई नगरपरिषद जिल्हा नव्हे तर राज्यात पहिली नगरपरिषद ठरल्याची चर्चा होत आहे कामगारांचा आशीर्वाद आमदार नमिताताई मुंदडा यांना नक्की मिळेल एवढे मात्र नक्की