गुढीपाडवा, रमजान ईद निमित्त अंबाजोगाई शहरातील विविध भागात पाणीपुरवठा विभागाने वितरणाचे केले व्यवस्थित नियोजन



.
अंबाजोगाई (प्रतिनिधी)-
नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक नसले कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी मागणी केली नसली तरी प्रशासन जनतेला सोयीसुविधा पुरवण्यात कुठेच कमी पडत नसल्याचे चित्र अंबाजोगाई शहरात सध्या तरी दिसत आहे नव्हे हेच जणू नगरपरिषदेच्या सीओ टोंगे मॅडम यांनी आल्यापासून जनतेला दाखवून दिले असेच म्हणावे लागेल त्यांनी पाणीपुरवठा विभागाची तातडीची बैठक नगरपरिषद कार्यालयात घेऊन गुढीपाडवा व रमजान ईद हे दोन्हीही सण एकत्रित आले आहेत शहरातील सर्व भागात पाणीपुरवठा करण्याचे निर्देश त्यांनी पाणीपुरवठा विभागाला दिले त्यानुसार त्याची अंमलबजावणी सुरू झाल्याचे समजते सीओ टोंगे मॅडम यांच्या अचूक नियोजनाचे जनतेतून कौतुक होत आहे
नगर परिषदेच्या सिओ यांनी पाणीपुरवठा विभागाची बैठक घेण्याआधी अभियंता अंकुश आडे व कपिल कसबे यांना सोबत घेऊन अंबा कारखाना येथे असलेल्या नगर परिषदेच्या जलशुद्धीकरण कुंभाची पाहणी केली आवश्यक त्या सूचनाही केल्या व त्यानंतर पाणीपुरवठा विभागाची नगरपरिषद कार्यालयात बैठक घेतली या बैठकीस पाणीपुरवठा विभागातील सर्व पाणीपुरवठा निरीक्षक, लाईन मेन इतर कर्मचारी उपस्थित होते गुढीपाडवा व रमजान ईद आहे त्यामुळे शहरातील सर्व भागात पाणीपुरवठा झालाच पाहिजे तो कराल असा मला विश्वास आहे अशी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सूचना केल्यानंतर सलग वेगवेगळ्या भागात नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागा मार्फत पाणी पुरवठा वितरण सुरू असल्याचे समजते
आज मंगळवार पेठ परिसरातील पाणीपुरवठा पूर्ण झाला असून त्यानंतर आजच सदर बाजार, पेन्शनपुरा मियाभाई कॉलनी, रमाई चौक, रायगड नगर, बाराभाई गल्ली, रोशन कॉलनी, मनियार गल्ली, रविवार पेठ, वडार वाडा या परिसरात पाणीपुरवठा सुरू झाला असल्याची माहिती मिळत आहे उद्या दिनांक 30 मार्च रोजी चौभारा, छल्ला ,खतीब गल्ली, झारे गल्ली, लाल नगर, क्रांतीनगर आदी भागाचा पाणीपुरवठा पूर्ण केला जाणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख कपिल कसबे यांनी दिली या व्यतिरिक्त एखाद्या भागात नागरिकांना पिण्याचे पाणीपुरवठा झाला नसल्यास त्या भागातील नागरिकांनी थेट कपिल कसबे यांच्याशी संपर्क करावा असेही त्यांनी म्हटले आहे