शास्वत व समृद्ध समाजनिर्मिती हेच भारतीय जैन संघटनेचे ध्येय-नंदकिशोर साखला

अंबाजोगाई-: (प्रतिनिधी )-
राष्ट्र उभारणीसाठी शास्वत व समृद्ध समाजनिर्मिती हेच भारतीय जैन संघटनेचे ध्येय आहे.असे प्रतिपादन भारतीय जैन संघटनेचे प्रदेशाध्यक्ष
नंदकिशोर साखला (नाशिक)यांनी केले.
बुधवारी अंबाजोगाईत भारतीय जैन संघटना(बीजेएस)च्या नूतन प्रदेश कार्यकारीणी चा सत्कार सामाजिक कार्यकर्ते गौतमचंद सोळंकी यांच्या निवासस्थानी करण्यात आला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना
नंदकिशोर साखला बोलत होते. यावेळी व्यासपीठावर बीजेएस चे प्रदेश उपाध्यक्ष केतन शहा(सोलापूर),बीजेएस चे राज्य सचिव दीपक चोपडा,राज्य समन्वयक चंद्रशेखर चोरडिया,मराठवाड्याचे उपाध्यक्ष धनराज सोळंकी, अंबाजोगाई चे अध्यक्ष निलेश मुथा,सामाजिक कार्यकर्ते गौतमचंद सोळंकी,सुभाष बडेरा,प्रेमचंद मुथा उपस्थित होते.
यावेळी बोलताना
नंदकिशोर साखला म्हणाले की बीजेएस चे संस्थापक शांतीलाल मुथा यांच्या मार्गदर्शनाखाली आमची महाराष्ट्रात वाटचाल सुरू आहे.आगामी काळात प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या माध्यमातूनच युवकांना समजून सांगितली जाणार आहे. समाजातील कुटुंबव्यवस्था, व विवाहसंस्थेचे मजबुतीकरण कसे करता येईल?.मूल्यांवर आधारित समाजाची रचना निर्माण करणे.तसेच सिंचनाच्या माध्यमातून ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था मजबूत करणे.ही कामे प्राधान्यक्रम देऊन करण्यात येणार असल्याचे नंदकिशोर साखला यांनी सांगितले. यावेळी केतन शहा,दिपक चोपडा,धनराज सोळंकी,निलेश मुथा यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सर्व उपस्थित नवनिर्वाचित प्रदेश कार्यकारीणी चा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे संचालन आनंद टाकळकर यांनी केले. तर उपस्थितांचे आभार संजय सुराणा यांनी मानले.यावेळी संतोष डागा, आनंद कर्णावट, सचिन कर्णावट,विनोद मुथा,अधिकार मर्लेचा,साहिल मुथा,आदेश कर्नावट,जतिन कर्नावट,आदित्य लोढा,प्रणव लोढा,ऋषभ मुथा
गुंजन ओस्तवाल,मयूर बडेरा,जवाहर मर्लेचा,
प्रवीण सोळंकी,भूषण मुथा,आधिकार मर्लेचा,
यश बडेरा ,विराज मुथा,वर्धमान ढोले,सुधीर महाजन,अनिल कंगळे, शिरीष ढोकर यांच्यासह बीजेएस चे कार्यकर्ते उपस्थित होते.